• Sat. Sep 21st, 2024

ऑनलाइन रम्मीमध्ये तरुण बनले कर्जबाजारी, युवकाने चक्क जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला लिहिले पत्र

ऑनलाइन रम्मीमध्ये तरुण बनले कर्जबाजारी, युवकाने चक्क जाहिरात करणाऱ्या अजय देवगणला लिहिले पत्र

नांदेड: सध्या सोशल मीडिया तसेच टीव्हीवर जंगली रम्मी आणि ऑनलाईन गेमच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. चक्क सिने अभिनेत्याकडून जाहिराती केल्या जात आहेत. मात्र अशा जाहिरातीमुळे तरुणवर्ग कर्जबाजारी होत चालला आहे. अशा जाहिरातीला कंटाळून नांदेडच्या एका तरुणाने सिने अभिनेता अजय देवगणला पत्र पाठवून जाहितीचा उद्देश विचारला आहे.

जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात वसुर येथील विलास शिंदे असं या तरुणाचे आहे. २० जून रोजी या तरुणाने स्पीड पोस्टने अजय देवगण यांना जुहू येथील पत्त्यावर पत्र पाठले आहे. आतापर्यंत या गेममधून तुम्ही किती पैसे कमवले या बाबत फेसबुक लाईव्ह करुन महाराष्ट्राच्या तरुणांना माहिती देण्याची विनंती देखील या तरूणाने केली आहे. तरुणाने अजय देवगणला पाठवलेल पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

नेमकं काय लिहिले आहे पत्रात?

महोदय अभिनेता देवगन सर नमस्कार आणि राम राम.. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावर केलं पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहिरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जणू सवयच लागली.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्गातच दारु पिऊन झोपला, नागरिकांनी केली पोलखोल

याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. जाहिरातीचा उद्देश काय आहे, हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजं. नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगितलं पाहिजे. ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे.

हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहिले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितलं पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed