• Mon. Nov 11th, 2024

    लव्ह मॅरेज केलं, पण ५ वर्षांत ३० वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलं, आता धक्कादायक कारण समोर!

    लव्ह मॅरेज केलं, पण ५ वर्षांत ३० वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलं, आता धक्कादायक कारण समोर!

    अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका प्रतिष्ठित कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित महिला काजल कांबे यांनी आत्महत्या केली होती. ही घटना मंगळवारी (२० जून) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनं मूर्तिजापूर शहर हादरून गेलं. पतीसह सासरच्यांच्या जाचाला कंटाळून काजलनं आत्महत्या केली असल्याचं आता उघड झालं आहे. या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

    काय होतं संपूर्ण प्रकरण?

    अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांचं प्रतिष्ठित कुटुंब. या कुटुंबातील काजल संकेत कांबे (३०) हिने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. काजलच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती. तिला दोन मुलंही आहेत. दरम्यान काजल कांबे २० जून रोजी सकाळी मूर्तीजापूर रेल्वे स्थानकावर गेली होती. जिथे रेल्वेचे इंजिन उभे राहतं तिथेही ती गेली, परंतु तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला हटकले अन् तिथून ती निघून गेली. रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका नाल्याजवळ म्हणजेच चिखली गेटच्या रेल्वे रुळावर गेली. तिथे आपली स्कुटी उभी करून चप्पल ठेवून दिली आणि पुणे- अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस येताच तिने रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये काजल गंभीर जखमी झाल्याने जागीच मरण पावली.

    एसटीची दुरावस्था, पावसामुळे प्रवाशांना एसटीत छत्री घेऊन प्रवास करण्याची वेळ

    दरम्यान आता या प्रकरणात काजलच्या सासरच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती संकेत राजेश कांबे (वय ३०), सासरे राजेश रामदास कांबे (वय ५२), अनुश्री राजेश कांबे (वय ५०), साक्षी राजेश कांबे (वय २५) या चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन यादव करीत आहेत,

    …तेव्हा पोलीस बंदोबस्तात झाला होता दोघांचा विवाह

    लग्नापूर्वीपासूनच काजल आणि तिचा पती संकेत हे दोघेही मूळ मूर्तिजापूर शहरातील रहिवासी. त्यांची चांगली मैत्री होती, या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढत गेला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पाच वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले. काजलचे लग्न पाच वर्षांपूर्वी झाले अन् कांबे यांची सून झाली. दरम्यान दोघांचा विवाह पोलीस बंदोबस्तात झाला होता, कारण या विवाहाच्या दरम्यान काजलचा पती संकेत याच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले होते, तसेच या विवाह सोहळ्यात तरुणीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

    या कारणांमुळे उचलले काजलनं टोकाचे पाऊल

    मृत काजलचे वडील संजय फूलचंद शर्मा (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काजल हिचा संकेतसोबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी आंतरजातीय विवाह झाला. कांबे कुटुंबीयांनी सुरुवातीला काही दिवस चांगले वागवले. लग्नाच्या काही दिवसानंतर तिच्या सासरच्यांनी ‘तू गरीब घरची आहे, दुसऱ्या जातीची आहे. आमच्या मनाप्रमाणे लग्न झाले नाही,’ या कारणांवरून सतत मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. काजलचं जगणं त्यांनी असाह्य करून टाकले,’ असा आरोप आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed