सातारा: शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये एका महिला जखमी आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शेतातील कामे करून जनावरांचा चारा घेऊन घरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून महिला जात होत्या. पावसामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला होता. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना घसरट्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. त्यात एक महिला जखमी झाली आहे.

ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील अलका भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५),लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०) सर्व रहाणार कारंडवाडी, ता. सातारा या जागीच ठार झाल्या .एक महिला जखमी झाल्या. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तपास करत आहेत.