• Mon. Nov 25th, 2024

    एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय राहुलचा मृतदेह नदीपात्रात सापडला; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

    एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय राहुलचा मृतदेह नदीपात्रात सापडला; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

    धुळे: शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसीमध्ये एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या आणि तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थ्याचा काल तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल नामदेव पाटील (वय २३ रा.रोटवद ता जामनेर जि.जळगाव. सध्या रा. चामुंडा माता मंदिर मागे करवंद नाका शिरपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.राहुल पाटील हा शिरपूर शहरातील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या फार्मसी कॉलेजमध्ये एम. फार्मचे प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. २१ जून २०२३ रोजी सायंकाळी कुठेतरी निघून गेला होता. याबाबत त्याच्या सोबत एकाच रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा मोठा भाऊ ललित पाटील यांस माहिती दिली.

    शिरपूर शहर पोलीस ठाण्यात राहुल हरवल्याची तक्रार २२ जून रोजी दाखल केली होती. यानंतर त्याचा शिरपूर शहर पोलिसांकडून शोध सुरू होता. काल (शुक्रवारी) त्याच्या मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे लगत तापी नदी पात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यामुळे शिरपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

    राहुलचा मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत. मात्र परजिल्ह्यातील एका उच्च शिक्षित युवक शहरातील नामांकित कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही.

    दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने आरोपी राहुल हंडोरेनं ट्रेकिंगचा बहाण्याने काढला काटा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed