हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पुढच्या ५ दिवसांत मान्सून सक्रिय होईल तर येत्या ५ दिवसांमध्ये जोरदार पाऊस बसेल अशी माहिती आहे. के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार कोकण आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.
El Nino Effect : भारतीयांचं टेन्शन वाढलं, आधीच मान्सूनचा लेटमार्क; अशात निसर्गाने टाकलं चिंतेत…
दरम्यान, मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या ३-४ दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.