• Sat. Sep 21st, 2024

लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू

लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू

Love Jihad case : समाजमाध्यमांवर लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे,’ असा दावा करणारा संदेश व्हायरल झाला होता. मात्र हा संदेश खोटा असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांकडून वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू आहे.

 

imeag
लव्ह जिहादचा खोटा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल; वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध सुरू
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : पोलिसांकडून आलेला संदेश असल्याचे भासवून ‘मिरा-भाईंदरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार घडला आहे,’ असा दावा करणारा संदेश व्हायरल झाला होता. मात्र अशा प्रकारची घटना घडलेली नसून हे वृत्त खोटे असल्याचे मिरा रोडच्या नया नगर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा संदेश पोलिसांकडून पाठवण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करतानाच, हा वादग्रस्त संदेश लिहिणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.’मिरा रोडच्या नया नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलाकडून ‘लव्ह जिहाद’चा प्रकार घडला असून यात मुलाच्या कुटुंबीयांचाही हात आहे,’ असा संदेश समाजमाध्यमांवर पसरला होता. हा संदेश पोलिसांकडून तयार करण्यात आला असल्याचे भासवण्यात आले होते. याबाबत गुरुवारी नया नगर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एका अल्पवयीन मुलाविरोधात बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये लव्ह जिहादसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Kalyan News: ऋतिक गटारात उतरला, पत्र्याला हात लागताच किंकाळी फोडली, कल्याणमध्ये सफाई कामगाराचा दुर्दैवी अंत
समाजात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक हा संदेश तयार करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे नया नगर पोलिसांनी वादग्रस्त संदेश तयार करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरू केला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed