• Mon. Nov 25th, 2024

    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Jun 23, 2023
    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबईदि. २३ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

                  मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी१२ वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती‘ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

                    ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्डशाळेचा दाखलामार्कशीटदोन फोटोपुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या.)मुंबई – गृहनिर्माण भवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलै२०२३ पर्यंत  अर्ज करावेत.

    0000 

    शैलजा पाटील/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *