• Sat. Sep 21st, 2024
अंबरनाथचा तरुण लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू, क्लासविना पहिल्याच प्रयत्नात यश

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : अंबरनाथ येथील वडवली विभागात राहणाऱ्या हर्षद परदेशी या तरुणाने ‘युपीएससी सीडीएस’ (कंबाईन डिफेन्स सर्व्हिस) या मिळवले आहे. कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययन करून या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेत त्याने भारतातून १२१ वा क्रमांक मिळवला आहे. येत्या ७ जुलै रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये १८ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली असून त्यानंतर भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून तो रुजू होणार आहे.

हर्षदचे शालेय शिक्षण बदलापूर येथील कार्मेल हायस्कूलमध्ये झाले. २०१६ मध्ये दहावीत ९० टक्के गुण मिळाल्यानंतर अकरावी आणि बारावी त्याने औरंगाबाद येथून केले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून त्याने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

‘वैभव’गाथा! बांधकाम मजूर बापाच्या कष्टाचं चीज, लेकाला दीड कोटींची शिष्यवृत्ती, ब्रिटनला जाणार
२०२२ मध्ये त्याला इंजिनीअरींगची पदवी मिळाली. त्याचवर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये त्याने ‘युपीएससी-सीडीएस’ परीक्षा दिली. स्वयं अध्ययन पद्धत अनुसणाऱ्या हर्षदने पहिल्याच प्रयत्नांमध्ये हे यश मिळवले. हर्षदचे वडील मुंबईतील खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे.

माणचा ओंकार गुंडगे UPSC मध्ये देशात ३८० वा; ४ वेळा संधी हुकली तरी मेहनतीने बाजी मारली

पालिकेच्या अभ्यासिकेचा उपयोग

अंबरनाथ पालिकेने वडवली विभागात उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासिकेचा उपयोग झाला. तिथे एकाग्र चित्ताने अभ्यास करता आल्याचे हर्षदने सांगितले.

लहान असतानाच ठरवलं, जिद्द अन् मेहनतीने स्वप्न पूर्ण, १९व्या वर्षीच क्रिशा जैन बनली पायलट

लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण

लष्करात सेवा करणे हे हर्षदचे स्वप्न होते. परंतु नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे अभियांत्रिकीच्या पदवीचा अभ्यास करीत असतानाच तो यूपीएससी-सीडीएस परीक्षेचीही तयारी करीत होता. मेहनत, एकाग्रचित्ताने केलेला अभ्यास आणि गुणवत्तेमुळे पहिल्याच प्रयत्नात त्याचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed