• Mon. Nov 25th, 2024

    Weather Alert: पुणेकरांसाठी गुड न्यूज; तीन दिवसात चित्र बदलणार, या दिवशी पावसाचे होणार आगमन

    Weather Alert: पुणेकरांसाठी गुड न्यूज;  तीन दिवसात चित्र बदलणार, या दिवशी पावसाचे होणार आगमन

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाने दडी मारल्याने नागरिक सध्या उन्हापासून बचावासाठी छत्रीचा वापर करीत आहेत. मात्र, पुढील तीन दिवसात चित्र बदलणार असून पुण्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही काही दिवस समाधानकारक पाऊस पडेल असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    दरम्यान, विदर्भामध्ये सध्या उष्णतेची लाट आल्याने तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे रेंगाळला आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रातही बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.

    पुण्यात दिवसभरात कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने जास्त म्हणजेच ३४.९ आणि किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दुपारी रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. तर उन्हाच्या झळांमुळे उकाडाही वाढला होता. तापलेले वातावरण निवळण्यासाठी संध्याकाळी पावसाची हलकी सर तरी यावी अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली. राज्यातील उच्चांकी तापमान ४२.६ अंश चंद्रपूरमध्ये आणि किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले.

    वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पावसासाठी चांगले दिवस आहेत. शनिवार, २४ जूनपासून पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारनंतर मध्यम स्वरूपाचा आणि पुढील दोन दिवस घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील उष्णतेची लाट ओसरणार असून, बहुतांश ठिकाणी तापमानात घट होणार आहे. – अनुपम कश्यपी, प्रमुख (हवामान अंदाज), भारतीय हवामानशास्त्र विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed