• Sat. Sep 21st, 2024

पुणे-गोवा विमानाने नको रे बाबा; प्रवास अवघ्या तासाभराचा अन् विलंब सहा तासांचा, प्रवासी हैराण

पुणे-गोवा विमानाने नको रे बाबा; प्रवास अवघ्या तासाभराचा अन् विलंब सहा तासांचा, प्रवासी हैराण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे ते गोवा दरम्यानच्या विमानांच्या उड्डाणाला आठवड्यातून तीन ते चार दिवस उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर दोन ते सहा तास थांबावे लागल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारींकडे विमानतळ प्रशासन ढुंकूनही पाहत नसल्याने विमानप्रवास करण्याऐवजी खासगी वाहनाने गोव्याला जाणे बरे, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.पुण्यातून पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून गोव्याला जाण्यासाठी दररोज दुपारी ‘स्पाइसजेट’चे विमान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या विमानाला सातत्याने उशीर होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. पुणे ते गोवा हा विमानप्रवास अवघ्या एका तासाचा असला, तरी प्रवाशांना विमानतळावर विनाकारण दोन ते ते सहा तास थांबावे लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत दोन ते तीन दिवस विमानांनी कित्येक तास उशिरा उड्डाण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे विमानप्रवासापेक्षा खासगी वाहनाने गोव्याला जाणे बरे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

विमानाच्या आधी गोव्याहून पुण्यात

मागील आठवड्यात गोवा ते पुणे या ‘स्पाइसजेट’च्या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला पुण्यात पोहोचण्यासाठी बारा तासांचा अवधी लागला. हे विमान दुपारी दोन वाजता निघणार होते. मात्र, त्याचे उड्डाण मध्यरात्री दीड वाजता झाले. संबंधित विमान पुण्यात पहाटे दोन वाजून २० मिनिटांनी उतरले. त्याच वेळी विमानाने गोवा ते पुणे असा नियमित प्रवास करणारे रवी गर्ग यांचे मित्र गोव्याहून कारने दुपारी तीन वाजता निघाले. ते रात्री एक वाजता पुण्यात दाखल झाले. त्यांनी विमानाच्या आधी कारने पुणे गाठले. पुणे-गोवा-पुणे दरम्यान विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हल्ली मनस्ताप होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आकाशवाणी पुणे… यापुढेही बातम्या देतच राहील, अखेर प्रसारभारतीने त्या निर्णयाला दिली स्थगिती
गेल्या आठवड्यात मी पुणे ते गोवा विमानाने प्रवास केला. माझ्या विमानाला साडेपाच तास उशीर झाला. या पूर्वी काही दिवस पुणे-गोवा विमानाला उशीर झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी संपर्क साधून चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.- आनंद सप्तर्षी, प्रवासी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed