• Sat. Sep 21st, 2024
प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते आणि…; दर्शना पवारचे शेवटचे भाषण, VIDEO समोर

पुणे : सर्वसामान्य कुटुंबातील दर्शना पवार हिने अतिशय कष्टाने अभ्यास करून एमपीएसीतील वनाधिकारी परीक्षा पास होऊन ती राज्यात तिसरी आली होती. काही दिवसातच ती अधिकारी आणि तिला अधिकारही मिळणार होते. तिच्या नव्या इनिंगची सुरुवात होणार होती. मात्र, निकाल लागल्याच्या काही दिवसातच तिचे सर्व स्वप्न संपली. दर्शनाची हत्या होऊन तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला. तिच्या शरीरावर आणि डोक्यावर असणाऱ्या जखमांमधून तिच्या हत्येची दाहकता जाणवत होती. सहा दिवसानंतर तिचा मृतदेह आढळला. अंगावर शहारे आणणारी ही घटना सर्वांनाच चटका लावणारी आहे.

दरम्यान, दर्शनाचं सिलेक्शन झाल्यानंतर पुण्यातील स्पॉटलाईट अॅकॅडमीमध्ये तिचा सत्कार झाला. त्यानंतर दर्शना पवारने जे भाषण केलं होतं, त्या शेवटच्या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणते आहे की, “प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येतेय. आपण स्कूल, कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलताय, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. विचारतात की सांग कसा अभ्यास केला पाहिजे. ती गोष्टी साध्य केलेली असते ना, त्यात खूप लोकांचा हात असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते”, असं दर्शना पवारने आपल्या शेवटच्या भाषणात म्हटलं आहे.
Darshana Pawar: दर्शनाची सुरु होणार होती नवी इनिंग, क्षणात स्वप्न भंगलं; पाहा MPSC टॉपरचा रिझल्ट
दर्शना पवार ही अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातील. सर्व सामान्य कुटुंबातील ही मुलगी, शाळेत देखील हुशार होती. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असल्याने ती एमपीएसी परीक्षेत टॉप आली होती. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुकही झाले होते. मात्र, १२ जून रोजी दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह ती राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली. दोघेही दुचाकीवरुन तिथे गेले. सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याची माहिती समोर आली. या घटनेपासून राहुल हांडोरे हा गायब आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

‘येणाऱ्या जाणाऱ्याकडे बाप फक्त मिटमीट डोळ्यांनी पाहत होता’; दर्शना पवारच्या मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed