• Mon. Nov 25th, 2024

    विकृतपणाचा कळस! पैशांसाठी केलं धक्कादायक कृत्य, संस्थाचालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल

    विकृतपणाचा कळस! पैशांसाठी केलं धक्कादायक कृत्य, संस्थाचालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मूल नसलेल्या एका कुटुंबाला दत्तक विधान करण्याबाबत कोणतीही मंजुरी नसताना, पाच लाख रुपयांमध्ये लहान बाळ विक्री करण्याचे प्रकरण जवाहरनगर पोलिस ठाणे आणि भरोसा सेलच्या संयुक्त कारवाईतून उघडकीस आले. या प्रकरणात जिजामाता बालक आश्रम (अनाथालय) संस्थेचे अध्यक्ष दिलीप श्रीहरी राऊत यांच्यासह अन्य तीन जणांच्या विरोधात जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.काय आहे प्रकरण?

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती भरोसा सेलच्या प्रमुख पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक ज्योती गात, पोलिस निरीक्षक अनिता फासाटे, सहायक पोलिस निरीक्षक डी. एम. चंदन, संजय गायकवाड, शोन पवार, राजेश चवहाण, बाळासाहेब बैरागी हे पथक शिवशंकर कॉलनी भागातील जिजामाता बालक आश्रमात पोहोचले. या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत व त्यांची पत्नी होते. या संस्थेत एका साडीच्या झोळीत दोन ते तीन महिन्यांचे बाळ होते. या बाळाचे कोणी नातेवाइक नसून, त्याची आई ४० वर्षांची आहे. या बाळाला दत्तक द्यायचे आहे, असे सांगण्यात आले.

    या संस्थेत या बाळाला दत्तक घेण्यासाठी एक दाम्पत्य आले होते. त्या बदल्यात राऊत यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात दिलीप राऊत व सविता दिलीप राऊत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानंतर या बालक विक्री प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात संस्थाचालक दिलीप राऊत यांच्यासह सविता दिलीप राऊत; तसेच या बाळाला जमा करणाऱ्या सुनीता विलास साबळे आणि अमोल मच्छिंद्र वाहूळ या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या बाळाला भारतीय समाज सेवा केंद्राच्या शिशूगृहात दाखल करण्यात आले आहे.

    दत्तक परवाना नाहीच

    या प्रकरणात जिजामाता बालक आश्रमाचे अध्यक्ष दिलीप राऊत यांच्याकडे संस्थेच्या कागदपत्रांची पोलिसांनी मागणी केली असता, त्यांच्याकडे महिला व बालविकास विभागाचे नोंदणीपत्र त्यांनी दाखविले. या संस्थेकडे दत्तक विधानाच्या संबंधित कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे.
    गुरुकृपा सोसायटीत १२ कोटींचा गैरव्यवहार; ८ कोटींच्या ठेवी अडचणीत, २७ जणांवर गुन्हा दाखल
    मुलाच्या जन्माबाबतचाही पुरावा नाही

    या प्रकरणात दोन ते तीन महिन्यांच्या बालकाला त्याची आई व मामाने संस्थेत आणले होते. या महिलेने या लहान मुलाची आई मी असल्याचा दावा केला हेाता. १४ जून रोजी या मुलाला संस्थेत आणण्यात आले होते. पोलिसांनी संबंधितांकडे या मुलाच्या जन्माबाबतचा पुरावा मागितला असता, हा पुरावाही मुलाच्या नातेवाइक असल्याचा दावा करणाऱ्यांनी संस्थेला दिला नाही. ही माहितीही समोर आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed