• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रवादीने पाळला गद्दार दिवस; शिवसेना फुटीच्या निषेधार्थ नागपुरात कार्यकर्त्यांची निदर्शने, घोषणाबाजी

राष्ट्रवादीने पाळला गद्दार दिवस; शिवसेना फुटीच्या निषेधार्थ नागपुरात कार्यकर्त्यांची निदर्शने, घोषणाबाजी

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी शिंदे गटाच्या विरोधात गद्दार दिवस पाळण्यात आला. ‘गद्दारांचे डोके, खोक्यांनीच ओके’, अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेनेत फूट पडली असली तरी, ठाकरे गटाकडून उपराजधानीत कुठलीच प्रतिक्रिया उमटली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नेतेही यापासून अलिप्त राहिले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आवाहनावरून नागपूरसह ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. व्हरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘पन्नास खोके, खाऊन माजलेत बोके, खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय’, अशा घोषणा दिल्या. राज्यात गद्दारी करून शिंदे गट गुवाहाटीला गेला होता. त्यास आज एक वर्ष पूर्ण झाले. या गटाविरोधात पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलनात अफझल फारुख, श्रीकांत घोगरे, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, शिव बेंडे, चिंटू महाराज, राजा बेग, महेंद्र भांगे, मोरेश्वर जाधव, रिजवान अन्सारी, राजूसिंग चौहान, दिनकर वानखेडे, अरविंद भाजीपाले, सुनील लांजेवार, आकाश थेटे, प्रशांत बनकर आदी सहभागी झाले होते.
Shishir Shinde : “शिशिर काका, बस करा हे” ठाकरेंची साथ सोडताच मनसे नेत्याचं ट्विट, कुणी दिला सल्ला?
ठाकरे गट-काँग्रेस अलिप्त

शिवेसना ठाकरे गटाकडून निषेधाचा कुठलाही कार्यक्रम घेण्यात आला नाही. शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष फुटीची साधी दखलही घेतली नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिंदे गटाने आनंदोत्सव केला नाही. ठाकरे गटाने सोमवारी काही ठिकाणी मिठाई वाटून वर्धापन दिवस साजरा केला होता. मंगळवारी मात्र सर्व पदाधिकारी, त्यांचे समर्थक शांत होते. महाविकास आघाडीचे घटक असलेले ठाकरे गटासोबत काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या गद्दार दिनानिमित्त आयोजित निदर्शनाकडे पाठ फिरवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed