• Sat. Sep 21st, 2024

हंडाभर पाण्यासाठी हातपंपावरच उघड्यावर झोपावं लागतं, ‘मटा’च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं

हंडाभर पाण्यासाठी हातपंपावरच उघड्यावर झोपावं लागतं, ‘मटा’च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतींची कहाणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केल्यानंतर सोमवारी (दि. १९) प्रशासकीय यंत्रणा हलली. देवडोंगरा येथे विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली व तेथे तातडीने टँकर रवाना करण्यात आला, तर येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत परिसरातील सर्व पाड्यांवर घरोघरी नळाद्वारे पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळच्या आदिवासी पाड्यांवर पाणीटंचाई भेडसावत असून, देवडोंगरा गाव व गोलदरीजवळच्या माणीपाडा, लोहारपाडा, हट्टीपाडा या पाड्यांवरील महिलांना हातपंपावरून दीड दोन किलोमीटरवरून पाणी वाहावे लागते. देवडोंगरा गावातील एकमेव हातपंपातून दोन तासांनी दोन हंडे पाणी येते. त्यासाठी महिला दिवसरात्र तेथे हंडे घेऊन नंबर लावून बसतात. एकदा नंबर लागला, की पुन्हा चार दिवस नंबर येत नाही. त्यामुळे महिला रात्री या हातपंपाजवळच उघड्यावर झोपतात.

Pune Crime News: पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, धक्कादायक कारण पुढे
हे धक्कादायक वास्तव ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्र्यंबकेश्वरची यंत्रणा हलली. सामाजिक कार्यकर्त्या मयुरी धुमाळ यांच्या सर्वेक्षणातून ही दुष्काळस्थिती समोर आली असल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. विस्तार अधिकाऱ्यांनी धुमाळ यांच्यासोबत देवडोंगरा येथे जाऊन पाहणी केली. तेथील सरपंच व ग्रामसेवकांनीही हातपंप व विहिरींना भेट दिली. देवडोंगरा येथे तातडीने टँकर रवाना करण्यात आला, नळांद्वारे पाणी सोडण्यात आले. अन्य पाड्यांसाठीही संबंधित ग्रामपंचायतींमार्फत पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. याशिवाय ‘जलजीवन’ मिशनची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून, ती ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर गोलदरी येथील विहिरीतून जलवाहिन्यांद्वारे घरोघर पाणी पुरवले जाणार आहे.

तथापि, तूर्त केवळ देवडोंगरा येथेच एक दिवसाआड टँकर पुरविला जात असून, अद्यापही माणीपाडा, लोहारपाडा, हट्टीपाडा या पाड्यांवरील महिलांना डोंगरवाट चढून व उतरून पाणी वाहावे लागत आहे. त्याबाबत ‘तेथे टँकर सुरू केला जाईल, मात्र विहीर फार दूर नाही’ अशी मखलाशीही यंत्रणेकडून करण्यात आली. यावरून डोक्यावरून पाणी वाहणे हे महिलांचे कर्तव्य़च आहे, ही मानसिकता व निर्ममता शासकीय अधिकाऱ्यांमध्ये किती घट्ट रुजलेली आहे, याचा प्रत्ययही यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना आला.

धरणासाठी जमिनी दिल्या मात्र पाण्यासाठी गावकऱ्यांना करावी लागतेय कसरत

अन्य गावे व पाड्यांचे काय?

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या बातमीनंतर सरकारी यंत्रणा हलली खरी. मात्र, बातमीत ज्या गावांचा व पाड्यांचा उल्लेख होता, त्याच गावांबाबत उपाययोजनांसाठी हालचाली करण्यात आल्या. तालुक्याच्या अन्य भागांतही दुष्काळस्थिती असून, महिलांना डोक्यावर पाणी वाहावे लागत आहे. त्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

Nagpur News: नादुरुस्त कार, तीन चिमुकले अन् खेळता-खेळता त्यांच्या आयुष्याचेच दार बंद झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed