• Sat. Sep 21st, 2024

Mumbai News: शिवडी न्हावाशेवा मार्गावरील पथकर किती असणार? टोलवसुली लटकली, कारण काय?

Mumbai News: शिवडी न्हावाशेवा मार्गावरील पथकर किती असणार?  टोलवसुली लटकली, कारण काय?

मुंबई: मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) शिवडी-न्हावाशेवा या रस्त्यावरील पथकर वसुलीसाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) बँक भागीदार सापडत नसल्याचे चित्र आहे. यासंबंधी दीड महिन्यांत दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ ‘एमएमआरडीए’वर आली आहे.शिवडी-न्हावाशेवा एमटीएचएल हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहे. तिन्ही टप्प्यांतील बांधकाम पूर्ण झाले असून आता चौथ्या टप्प्यातील सुविधांशी संबंधित कामे सुरू आहेत. त्यामध्येच ‘ओपन रोल टोलिंग’ पद्धतीच्या पथकर वसुलीचा समावेश आहे. ही कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र पथकर वसुलीसाठी बँक भागीदारच मिळत नसल्याची स्थिती आहे.

एमटीएचएल हा २२ किमी लांबीचा मार्ग असून १६ किमी समुद्रावर आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्लेपर्यंत हा मार्ग आहे. त्यामुळेच या मार्गावर चिर्लेच्या आधी गवाण येथे मोठा टोल प्लाझा असेल. त्या दोन्ही बाजूने प्रत्येकी सहा असे एकूण १२ ‘ओपन रोड टोलिंग’ पद्धतीचे पथकर नाके असतील. तसेच शिवडी बाजूने शिवाजीनगरजवळदेखील टोल प्लाझा असेल. त्याठिकाणीदेखील सहा मार्गिकांसाठी १६ ‘ओपन रोड टोलिंग’ पद्धतीचे पथकर नाके असतील. हे पथकर फास्टॅग व ईटीसी या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील. त्यासाठी बँकिंग भागीदाराची गरज आहे. हा भागीदार शोधण्यासाठी एमएमआरडीएने मे महिन्यातच निविदा काढली होती. मात्र एकाही बँकेने निविदेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ ‘एमएमआरडीए’वर आली आहे.

‘ओपन रोड टोलिंग’

‘ओपन रोड टोलिंग’ (ओआरटी) ही यंत्रणा वाहतूक कोंडीविरोधी असते. त्यामध्ये वाहनचालकांना गाडी न थांबवता थेट पुढे जाता येते. गाडी नाक्यावर येण्याआधीच त्यांचा पथकर बँक खात्यातून थेट कापला जाणार आहे. यासाठीच ही यंत्रणा बसवताना बँकिंग भागीदाराची ‘एमएमआरडीए’ला गरज आहे.

प्रस्तावित पथकर दर असा (रुपयांत)

वाहनाचा प्रकार शिवडी-शिवाजीनगर शिवाजीनगर-चिर्ले एकूण

कार १८० ६० २४०

हलके व्यावसायिक २४० ७० ३१०

बस ४२० १३० ५५०

अवजड ४२० १३० ५५०

बहुचाकी ६०० १८० ७८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed