आधी साई मंदिराच्या दानपेटीत दोन हजार रुपयांच्या तीन ते चार नोटा मिळायचा. मात्र आता या निर्णयानंतर त्याची संख्या वाढली आहे. आजच्या मोजणीत साई मंदिराच्या दानपेटीत १०० पेक्षा जास्त २०००च्या नोटा मिळून आल्या आहेत. बाजारातील काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने २००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण या नोटा बँकेत जमा न करता मंदिराच्या दानपेटीत टाकताना दिसतात.
आरबीआयने २०००च्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. RBIने क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २००० रुपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदलून घ्याव्यात, असे आवाहन आरबीआयने केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहे.
नोटा बदलण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी २००० रुपयांच्या नोटांच्या देणगीची संख्या आणखी वाढेल, असं मंदिर व्यवस्थापनाने म्हटलं आहे. २०००ची नोट ही भारतीय रुपयांच्या चलनातली सर्वात मोठी नोट आहे. देशातील काळा पैसा संपवण्याच्या विचाराने सरकारने ती आणली होती. मात्र आता ती चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नोटा बदलून घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देवावर श्रद्धा असलेले काही लोक या नोटांचा माध्यमातून पुण्य मिळवण्यासाठी मंदिरात दानाचा आधार घेत आहेत.