• Mon. Nov 25th, 2024
    अजित पवारांचा अनोखा अंदाज, संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या रथाचं सारथ्य

    बारामती: तुकारामांचा जयघोष करत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीला पोहोचला आहे. दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी रथाचे सारथ्य केले.
    नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज; अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…
    संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील उंडवडी येथील मुक्काम आटपून आज बारामती शहरात दाखल झाला. बारामती शहराच्या वेशीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर देशमुख चौकातून पवार यांनी स्वतः रथाचे सारथ्य केले. संत तुकोबाच्या दर्शनासाठी सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या भाविकांनी हा अनुपम भक्ती सोहळा डोळ्यांत साठवून घेतला. तुकाराम महाराज पालखी पादुकांना स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती.

    माणसाच्या विकासाबरोबर बदल अपेक्षित करणारा असा अभंग म्हणत शारदा प्रांगणात पालखी येताच पुंडलिक वरदा..हरी विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम ! असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी मंडपात स्थानपन्न केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि संघटनांतर्फे उपवासाचे पदार्थ देऊन वारकर्‍यांची सेवा केली. दुपारनंतर शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीराम मंदिर, सिद्धेश्वर मंदिरासह सर्व मंदिरांमध्ये वैष्णव विसावले.

    आम्ही तुझ्या सोबत आहोत ताई, मंचावर बोलावून उद्धव ठाकरेंकडून अयोध्या पौळ यांना पुष्पगुच्छ

    थोडा विसावा घेऊन वारकरी पुन्हा भजन आणि किर्तन करीत हरिनामामध्ये दंग झाले. दरवर्षीच पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी उसळते. यंदाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, आयटी क्षेत्रातील नोकरदारांनी अनुपम पालखी सोहळ्याचा आनंद घेत पालखीत सहभागी झाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed