• Sun. Sep 22nd, 2024
दगड डोक्यात घालून हत्या, पुण्यात जिगरी मित्रांनीच घेतला जीव; त्या खुनाचं धक्कादायक कारण समोर

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. दररोज हत्येच्या छोट्या मोठ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. अगदी किरकोळ कारणावरून अशा घटना घडत असल्याचे देखील आपण पाहतो. मोशी परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. भंगार विक्री करून मिळालेल्या फक्त पैशांच्या वाटनीवरून मित्रांमध्ये वाद होऊन मित्राचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. १२ जून रोजी ही घटना उघडकीस आली होती.

पोलिसांनी जितेंद्रकुमार सुभाष भारद्वाज (वय २८ ), रवी सुखलाल गींधे (वय २७ ) यांना अटक केली. त्यांचा साथीदार टिक्या हा फरार आहे. रवींद्र सिंह असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Manisha Kayande : मनिषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाची मोठी कारवाई, शिंदे गटात जाण्यापूर्वीचं उचललं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि रवींद्र सिंह रस्त्यावर भंगार वस्तू गोळा करून त्यांची विक्री करण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करायचे. त्याचदरम्यान, वादळी वाऱ्यामुळे मोशी भागातील काही दुकानांचे आणि घरांचे पत्रे उडून गेले होते. या उडालेल्या पत्र्याची या चार मित्रांनी विक्री केली. त्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचे त्यांनी एकमेकांत वाटप केले. मात्र, त्यावरून त्या चौघांमध्ये वाद झाला आणि या तिघांनी मिळून रवींद्र सिंह याची दगडाने ठेचून हत्या केली.

१२ जून रोजी हा प्रकार समोर आला होता. मृतदेह सापडल्याने ही घटना समोर आली होती. दगडाने ठेचून हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी कुदळवाडी परिसरात सापळा लावून जितेंद्रकुमार आणि रवी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Monsoon Update : मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी स्थिती नेमकी कशी, हवामान विभागाची नवी अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed