• Sat. Sep 21st, 2024

धम्मसंगिनी रामा गोरख ठरल्या कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या अभिवादन पुरस्काराच्या मानकरी

धम्मसंगिनी रामा गोरख ठरल्या कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या अभिवादन पुरस्काराच्या मानकरी

अहमदनगर: कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय अभिवादन पुरस्कार धम्म संगिनी रामा गोरख यांना जाहीर झाला आहे. कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी पुरोगामी जनचळवळीतील अभ्यासू कार्यकर्ता धम्मसंगिनी रामा गोरख यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती कॉ जाधव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. कॉम्रेड भास्करराव हे साम्यवादी विचारांचे निष्ठावान पूर्णवेळ कार्यकर्ते होते. लाल निशान पक्ष लेनिनवादीच्या राज्य सरचिटणीस पदाचे काम करतानाच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या राज्यव्यापी संघटना उभ्या करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

कॉम्रेड जाधव यांनी दैनिक श्रमिक विचार चे संपादक म्हणून काम करीत असताना गरीब ,कामगार, कष्टकरी ,वंचित समाजातील साहित्यिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. जाधव साहित्यिक गीतकार होते. लोकसाहित्याचा त्यांचा दांडगा अभ्यास होता . त्यांनी लिहिलेली राजकीय सामाजिक वागनाट्य खूप गाजली,आजही त्यांची चळवळीची गाणी सर्वत्र गायली जातात.आयुर्वेद तसेच विविध ज्ञानशाखाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता.

विविध पैलू असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठानचे कार्यकारिणी व लाल निशान पक्ष लेनिंनवादी च्या वतीने कॉम्रेड भीमराव बनसोडे यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्या धम्मसंगिनी या गेल्या वीस वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत व आंबेडकरवादी बौद्ध प्रवाहाच्या सक्रिय कार्यकर्त्या, स्त्रीवादी स्त्रीमुक्ती चळवळीच्या क्षेत्र अभ्यासक, समकालीन प्रश्नांवर विविध नियतकालिकांमधून लिखाण करणाऱ्या समीक्षक व लेखिका असून जात वर्ग लिंगभाव केंद्री परिषदांच्या चर्चा सत्रांच्या आयोजनात त्यांचा भरीव सहभाग आहे त्या विद्यापिठीय परिषदांमध्ये बीजभाषक, तज्ञ मार्गदर्शक व निबंधवाक म्हणून त्यांनी सहभाग नोंदविला आहे. धम्मसंगिनी यांचे धर धम्मनंद कोसंबी यांचे पाली आणि बौद्ध धम्म प्रसारातील योगदान (२०१०) स्त्रीवादाचे प्रवाह (२०१६) व स्त्रीवादी आंबेडकरवाद (२०१६) ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. धम्मसंगिनी रामा गोरख यांच्या कार्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य म्हणजे गाव खेड्यात विखुरलेल्या अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे योगदान प्रकाशात आणून त्यांना जोडण्याचे काम त्या अखंडपणे करीत आहेत स्पष्ट व अभ्यासू भूमिका हे त्यांच्या लिखाणाचे व कामाचे वैशिष्ट्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed