• Sat. Mar 7th, 2026

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बोलवाड फाटा ते तपोवन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

    ByMH LIVE NEWS

    Jun 18, 2023
    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बोलवाड फाटा ते तपोवन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

    सांगली दि. 18 (जिमाका) :-  मिरज तालुक्यातील बोलवाड फाटा ते तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरमीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. रस्त्याची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    या कार्यक्रमास टाकळी तपोवनचे प. पु. शिवदेव स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. कोरे, टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच हिना असिफ नदाफ, बोलवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच निगार रियाज शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed