• Mon. Nov 25th, 2024

    व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!

    व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवून या व्यावसायिकाला गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्याच्याकडून एक कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात तसेच, तिच्या इतर सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

    या प्रकरणात फसवणूक झालेले ५१ वर्षीय थॉमस हे कामोठे येथे राहण्यास असून नोव्हेंबर २०२०मध्ये निकोल लीन नावाच्या महिलेने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थॉमस यांच्यासोबत मैत्री केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सॲप चॅटिंगवरून संवाद वाढल्यानंतर निकोल लीन हिने थॉमस यांचा विश्वास संपादन करून त्यांना गोल्ड ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना मोबाइलवर मालामो ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला थॉमस यांनी ५० हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ५४ हजार रुपये परत मिळाले. त्यामुळे थॉमस यांनी नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१या कालावधीत १५ लाख रुपयांचे गोल्ड ट्रेडिंग केले. परंतु, त्यातून थॉमस यांना काहीही परतावा मिळाला नाही. त्यानंतर मार्च २०२१मध्ये निकोल लीन हिने पुन्हा थॉमस यांना संपर्क साधून गोल्ड ट्रेडिंगमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना वाइन ट्रेडिंग करण्यास सांगितले. त्यात निकोल हिने ५० टक्के नुकसान घेण्याचे आश्वासन देऊन त्यांना वाइन ट्रेडिंग करण्यास भाग पाडले. त्यासाठी निकोल लीन हिने जीआयसी हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डब्बा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईकरांसोबतच पुणेकरांनाही फटका

    त्यानंतर थॉमस यांनी निकोल लीन हिच्या सांगण्यानुसार मार्च ते जुलै २०२१ दरम्यान तब्बल १ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांचे वाइन ट्रेडिंग केले. या ॲपवर २० कोटी ९५ लाख रुपये दाखविण्यात येत होते. त्यामुळे थॉमस यांनी त्यातील काही रक्कम काढण्याची विनंती केली असता, निकोल हिने पुष्कर ठाकूर यांच्या खात्यावर रक्कम पाठवण्यास सांगितले. मात्र थॉमस यांनी ठाकूर याच्या खात्यावर रक्कम न पाठविता परस्पर ॲपमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर निकोल लीन हिने थॉमस यांना ॲपवरून पैसे काढण्यासाठी आणखी पैसे पाठविण्यास सांगितल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *