• Mon. Mar 16th, 2026

    अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डब्बा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईकरांसोबतच पुणेकरांनाही फटका

    अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डब्बा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईकरांसोबतच पुणेकरांनाही फटका

    अंबरनाथ : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना सकाळी सकाळी त्रास सहन करावा लागत आहे.अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

    अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डब्बा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत झाला आहे.

    पुण्याला जाणाऱ्या अनेक महत्वाच्या गाड्या या मार्गावरूनच धावत असतात, परंतु, या अपघातामुळे पुण्याकडून येणारी आणि पुण्याला जाणारी वाहतूक अनिश्तिच काळासाठी विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेचा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed