• Sat. Sep 21st, 2024

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता तान्ह्या बाळासह रेल्वे प्रवास होणार सोप्पा, रेल्वे स्टेशनवर खास सुविधा

महिलांसाठी आनंदाची बातमी! आता तान्ह्या बाळासह रेल्वे प्रवास होणार सोप्पा, रेल्वे स्टेशनवर खास सुविधा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : स्तनदा मातांच्या विश्रांती आणि सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सात रेल्वे स्थानकांत मध्य रेल्वेने १३ आधुनिक नर्सिंग पॉड सुरू केले आहेत. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर फीडिंग अँड रेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स (एमआयएनएफआरआयएस) धोरणांतर्गत रेल्वे स्थानकांत पॉडची उभारणी करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ३५ लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात. यातील २० टक्के महिला प्रवासी आहेत. लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिलांचा टक्का अधिक असून या मातांना स्तनपान करण्यासाठी सुरक्षित आणि आरामदायी जागा निर्माण करण्यात आलेली आहे. लोकलमधील गर्दीत बाळासह प्रवास करणे हे मातासाठी मोठे आव्हान आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात स्तनपान करणाऱ्या मातांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक नर्सिंग पॉड सुरू करण्यात आले आहे. दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये प्रत्येकी तीन, ठाणे स्थानकात दोन, कल्याण आणि पनवेल स्थानकांत नर्सिंग पॉड सुरू करण्यात आले आहे. लोणावळ्यात लवकरच दोन नर्सिंग पॉड सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
ST Bus : गुड न्यूज, प्रवाशांची लालपरी अखेर नफ्यात, एसटीच्या या विभागानं करुन दाखवलं, कोट्यवधींची कमाई
सोफा, उशीची व्यवस्था

नर्सिंग पॉडमध्ये माता आणि त्यांच्या बाळासाठी सोफा आणि उशी यांची सुविधा आहे. वायुवीजनासाठी पंखा, रोषणाईसाठी प्रकाश आणि वापरलेल्या डायपरच्या विल्हेवाटीसाठी एक कचरापेटी पॉडमध्ये उपलब्ध असणार आहे. या सुविधांच्या देखभालीसाठी परवानाधारक कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed