• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai News: इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मोठा अनर्थ टळला; कारण…

    मुंबई : प्रभादेवीच्या खेडगल्ली येथील कपिला इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिसिटी केबीनला आग लागल्याची घटना घडली. ही आग पसरून मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र, असं वाटत असताना बिल्डिंगमध्ये राहत असलेला रहिवासी दीपक निगडे नावाच्या व्यक्ती देवदूतासारखा धावून आला.

    कपिला इमारतीचे सेक्रेटरी संतोष झेंडे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना केबिनमध्ये आग लागल्याचे दिसले. कसलाही विचार न करता त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. संतोष झेंडे यांनी इमारतीच्या कमिटी मेंबर लोकांना फोन करुन खाली येण्यास सांगितलं आणि रहिवाशांना तात्काळ कळवा अशा सूचना दिल्या. त्यातच केबिनमध्ये मोठ्याने आवाज येत होते.

    गळ्यात भगवी शाल, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची मुख्यमंत्री शिंदेंशी भेट
    दीपक यांनी आजूबाजूच्या गाढ झोपेत असलेल्या शेजाऱ्यांना कळवले आणि इतरांनाही कळवा अशा सूचना देऊन ते जिना असलेल्या मार्गाने खाली आले. खाली येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. केबिनमध्ये आग लागली असल्यामुळे वाळूची गरज होती. त्यांनी बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटमधून वाळू आणली. त्यांना गुरुचरण बिंगी आणि इतर रहिवाशांनी मदत केली.

    वाळू आणून त्यांनी ती जमिनीवर ओतून हाताने आगीवर टाकली आणि आग रौद्ररूप धारण करणार असं वाटत असतानाच त्यांनी आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या गाड्या क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी पोहोचल्या. परंतु ही आग ते येण्याआधीच विझवली. दीपक यांनी दाखवलेल्या या धाडसाचे स्थानिक रहिवाशांनी कौतुक केलं आहे.

    पराभवानंतर रोहित काय करतोय? चाहत्यांना पडलेले प्रश्न, बायकोच्या पोस्टमध्ये मिळालं उत्तर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed