• Mon. Nov 25th, 2024

    जिल्हा विभाजन? छे छे ते तर… शिर्डी-श्रीरामपूर वादावर राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती

    जिल्हा विभाजन? छे छे ते तर… शिर्डी-श्रीरामपूर वादावर राधाकृष्ण विखे पाटलांची स्पष्टोक्ती

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासाठी आणखी एक अपर जिल्हाधिकारी पद मंजूर करून त्यांच्यासाठी शिर्डी येथे कार्यालय सुरू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला. मात्र, शिर्डीत हे कार्यालय होणे म्हणजे जिल्हा विभाजन आणि नवीन जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डीत करण्याची योजना असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमधून शनिवारी बंदची हाक देण्यात आली आहे. या मुद्यावर आता स्वत: विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.

    शिर्डीतील हे कार्यालय केवळ नागरिकांच्या सोयीसाठी असून जिल्हा विभाजनाचा कोणताही विचार नाही, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

    अहमदनगरमध्ये विखे पाटील पत्रकारांशी बोलत बोलत होते. विखे पाटील म्हणाले, जिल्हा विभाजन व शिर्डीतील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचा काहीही संबंध नाही. जिल्हा निर्मितीचा हा निर्णय नाही. उत्तर नगर जिल्ह्यातील पाच-सात तालुक्यांना विविध शासकीय कामांसाठी सोयीचे व्हावे म्हणून शिर्डीत या कार्यालयाची निर्मिती केली आहे.

    उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारं खुली, त्यांनी पुढाकार घ्यावा, उपमुख्यमंत्र्यांची खुली ऑफर
    श्रीरामपूरला या कार्यालयाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मला राजकारण दिसते. ज्यांच्याकडे सात-आठ वर्षे महसूल मंत्री पद होते, त्यांनी या सुविधेसाठी पावले उचलली नाही, पण त्यांच्या विरोधात बंड करण्याची सध्या आंदोलन करीत असलेल्यांनी कधीच भूमिका घेतली नाही, असे म्हणत विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

    संजय राऊतांना आलेल्या धमकीची दखल घेण्याची गरज नाही; राधाकृष्ण विखे-पाटलांनी डिवचलं

    भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील जाहिरात वादाबाबत बोलताना विखे म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्यावर पडदा पडला आहे. या जाहिरातीसंदर्भात ते दोन्ही नेते व पक्षांचे संबंध नाहीत. अति उत्साही लोकांचा तो भाग दिसतो, पण यातून मार्ग काढण्यात आमचे दोन्ही नेते सक्षम आहेत.

    ज्यांना कंटाळून ठाकरेंना सोडलं, त्यांच्याशी गोडी’गुलाबी’; पवार-गुलाबरावांचा एकत्र प्रवास
    महाविकास आघाडीचे नेते आमच्या सरकारच्या भविष्यावर खूप बोलत असतात, परंतु दुर्दैवाने त्यांचे भविष्य खरे ठरत नाही, याचे शल्य त्यांना आहे. त्यामुळे ते आमच्या भविष्याबद्दल काहीही बोलतात व स्वतःच्या जखमेवर मीठ चोळून घेतात. त्यांची वज्रमूठ खुर्चीसाठीच होती व आता ते ती एकमेकांवर उगारत आहेत आणि आमचे सरकार मात्र भक्कम आहे, असा दावाही विखे पाटील यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *