• Sat. Sep 21st, 2024
कियानला ताप आलाय, तो झोपला आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय विनंती केली?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राज यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मध्यरात्रीच शिवतीर्थावर दाखल झाले होते. यामध्ये उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांचाही समावेश होता. हे कार्यकर्ते झाडांची रोपे आणि शैक्षणिक साहित्य घेऊन आपल्या आवडत्या नेत्याचं वाढदिवशी अभिष्टचिंतन करण्यासाठी आले होते. मात्र यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर राज यांनी कार्यकर्त्यांना एक विनंती केली असून याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर राज यांनी यावेळी ‘माझा नातू कियानला ताप आला असून तो झोपलाय. त्यामुळे आरडाओरड करू नका,’ अशी विनंती आपल्या कार्यकर्त्यांना केली. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले आणि त्यांनी मोठा आवाज करणं टाळलं.

दरम्यान, यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

Mumbai Rain: मान्सून आला, पण पावसाचा जोर वाढणार कधी? मुंबई आणि परिसरात पुढील ३ दिवस असं असेल वातावरण

यंदा राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं खास आवाहन

राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक पत्रक काढत आपल्या कार्यकर्त्यांना खास आवाहन केलं आहे. ‘शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा,’ अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या आवाहनाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसत असून राज यांना मोठ्या प्रमाणात झाडांची रोपं आणि शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed