• Sat. Sep 21st, 2024

तुमच्या घरात वाईट शक्ती; कलश पूजा करावी लागेल, त्यानंतर उच्च शिक्षित महिलेसोबत पाहा काय झालं

तुमच्या घरात वाईट शक्ती; कलश पूजा करावी लागेल, त्यानंतर उच्च शिक्षित महिलेसोबत पाहा काय झालं

बीड: तुमच्या घरातील वाईट शक्ती काढून टाकतो यासाठी कलश पूजन करावा लागेल, असे म्हणत भामट्यांनी एका शिक्षिकेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १४ तोळ्यांना गंडा घालून कथित मांत्रिक फरार झाले आहेत. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अघोरी विद्यांचा वापर करून घरातील दुःख बाहेर काढतो अशा प्रकारचा ढोंगीपणा करणारे अनेक जण आहेत. त्यातीलच दोन ढोंगी मंत्रिकांनी तुमच्या घरात वाईट शक्तीने प्रवेश केला आहे आणि ती बाहेर काढावा लागेल. यासाठी सुवर्णकलश पूजन करावा लागेल असं म्हणत घरातील लोकांना विश्वासात घेतले. एक पुरुष आणि महिला या दोन अघोरी विद्या करणाऱ्या व्यक्तींनी पूजा करण्याच्या नावाखाली घरातील सर्व दागिने या कलशात टाकावे लागतील असे सांगितले.

माझ्या पत्नीला जादुटोणा करून संपवले; संशयातून पुतण्याने काकासोबत…
घरातील जवळपास १४ तोळ्यांचे सर्व दागिने हे एका कलशात टाकून त्याची पूजा घरातील व्यक्तींच्या हाताने करण्यात आली. त्यानंतर काही वेळासाठी आम्ही आता या आघोरीशक्ती बांधून टाकतो असं म्हणत घरातील लोकांना बाहेर काढलं गेलं. काही वेळानंतर सगळ्यांना पुन्हा एकदा घरात बोलवलं आणि हा कलश पुढील काही वर्ष उघडू नका असं सांगितलं. मात्र, मांत्रिक घरातून निघून गेल्यानंतर घरातील सदस्यांना या प्रकाराचा संशय आल्याने त्यांनी हा कलश उघडण्याचा निर्णय घेतला.

कलश उघडून पाहिल्यानंतर ज्या कलशात सोन्याची दागिने टाकले होते त्यात अक्षरशः कोळसा निघाल्याने घरातील लोकांच्या पायाखालची वाळूच सरकली. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं कळताच कुटुंबातील लोकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार राजेंद्र लोटके आणि मीना लोटके रा.( अहमदनगर) या दोघा मांत्रिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शिक्षिकेच्याच घरात अशा पद्धतीचे कृत्य व्हावं हे तर कुठेतरी समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जाणारं आहे.

स्मशानभूमीत अतिक्रमण, अंत्यविधीवरून गावागावांत तंटे; बीडवासीयांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचून आंदोलन

सुशिक्षित व्यक्तींनाच असे भामटे जर गंडवत असतील तर सर्वसामान्यांना किती गंडवलं असेल याचा अंदाज सांगता येत नाही. मात्र, अशा आघोरीकृर्त्यांच्या आहारी जाणारे सुशिक्षित लोकच जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळतं. लोकांच्या भावनेचा फायदा घेत हे आघोरी कृत्य करणारे लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा व्यक्तींना हजारो-लाखो रुपयांचा गंडा घालतात. अशा प्रकरणात एकदा फसवणूक झाली की शेवटी रडण्याशिवाय हातात काही येत नाही.

करणीचे संकट दूर करण्यासाठी महिला मांत्रिकाने २५ हजार रुपये मागितले आणि…
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अशा अघोरी कृत्यांच्या आहारी न जाता, असा कुठे प्रकार घडत असेल तर याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed