महिनाभरापूर्वीच साक्षीचा विवाह अभिजीत तायडे या तरुणासोबत झाला होता. लग्न झाल्यापासून अभिजित साक्षीसोबत नीट बोलतच नव्हता. लग्न लागल्या पासूनच अभिजित हा वारंवार माझा विवाह माझ्या संमतीविना तुझ्याशी लावून दिला आहे. त्यामुळे तू मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत साक्षीचा छळ करत होता.
एवढ्यावरच न थांबता लग्न जमवताना तुझ्या वडिलांनी केलेल्या बोलणी प्रमाणे हुंडा आणि लग्नात वस्तूही दिल्या नाहीत, असे टोमणे मारत त्यावरून सतत भांडण करत असे. या महिन्यातच तुझ्या बापाकडून वस्तू घेऊन ये, असं म्हणत त्रास देत होता. आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती साक्षीने आपल्या माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली होती. आज ना उद्या वातावरण निवळेल, साक्षीला त्रास कमी होईल, असे साक्षीच्या माहेरच्यांना वाटायचे त्यामुळे त्यांनी मुलीला धीर देत समजावून सांगितले होते. मात्र,तरी सुद्धा अभिजितकडून होणारा त्रास वाढत चालल्याने अखेर साक्षीने काल मंगळवारी रात्री टोकाचा निर्णय घेत राहत्या घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
अभिजित तायडे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंभोरे करीत आहे.