• Sat. Sep 21st, 2024

पार्कमधून विद्यार्थ्याला पळवलं, नंतर मोबाइल लुटला, पण लहानग्याने शक्कल लढवली अन् सुटका झाली!

पार्कमधून विद्यार्थ्याला पळवलं, नंतर मोबाइल लुटला, पण लहानग्याने शक्कल लढवली अन् सुटका झाली!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : चोरीचा आरोप करीत दोन युवकांनी १५ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्याकडील मोबाइल लुटला. विद्यार्थ्याने संधी साधून स्वत:ची सुटका केल्याने अनर्थ टळला. आयुष असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.अशी आहे घटना

दहाव्या वर्गाचा विद्यार्थी असलेला आयुष हा सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतो. त्याच्या आई-वडिलाचा मेसचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तो चिल्ड्रेन ट्राफिक पार्क परिसरात आइस्क्रिम आणायला गेला. व्हीआयपी गॅरेजसमोर दोन युवकांनी त्याला अडविले. ‘तू मोबाइल चोरी केला आहे’, असा आरोप करीत बळजबरीने त्याला मोटारसायकलवर बसविले. दोघे त्याला घेऊन प्रतापनगर परिसरात गेले. तेथे मोटारसायकलमधील पेट्रोल संपले. युवकांनी आयुषकडूनच पैसे घेऊन एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरले. त्यानंतर त्याला घेऊन ते पारडी परिसरात गेले. तेथे त्याचा मोबाइल हिसकावला.

नात्याला काळिमा! वहिनावर असलेल्या रागाने ओलांडली सीमा; दिराकडून भयंकर कृत्य, नागपूर हादरलं
याचदरम्यान एका युवकाच्या खिशातून पैसे पडले. युवक पैसे उचलायला लागला. संधी साधून आयुष त्यांच्या तावडीतून पसार झाला. एका फळभाजी विक्रेत्याला भेटला. त्याच्या मोबाइलवरून वडिलाच्या मोबाइलवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या वडिलाने सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी त्याला घरी आणले. वडिलाच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पेट्रोल पंपावर सीसीटीव्हीची पाहणी केली. आयुषसह दोन युवक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्या दोन युवकांचा पोलिस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed