गेली अनेक वर्ष म्हाडाच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. २०२३ साली माजी लोकायुक्त सुरेशकुमार अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने २०१४ साली या संदर्भात अहवाल दिला होता. इतके वर्ष हा अहवाल धूळखात पडून होता. मात्र, आता अहवालातील काही शिफारशी लागू करण्याचे धोरण म्हाडाने स्वीकारले आहे
यानुसार म्हाडाने पाऊल उचलत म्हाडा कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना असलेले २ टक्के आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच राज्य असर्कारी कर्मचाऱ्याने असलेले ५ टक्के आरक्षणही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कर्मचारी अत्यल्प गटात बसत नसल्याने ते अर्ज करत नाहीत. त्यामुळे घरे रिकामीच राहतात. मात्र, आता ही घरे आत्याचारपीडित महिला, तृतीयपंथी व्यक्ती आणि असंघटित कामगारांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. त्यामुळे या वर्गाला हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे.
कोणाला किती टक्के आरक्षण?
लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि म्हाडा कर्मचारी यांचे आरक्षण रद्द करून अत्याचार पीडित महिलांना ४ टक्के, जेष्ठ नागरिकांना २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या बरोबरच तृतीयपंथी व्यक्तींनाही १ टक्के आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना ४ टक्के आरक्षण देण्याचे म्हाडाने प्रस्ताव दिला आहे.