Girish Mahajan On Sanjay Raut: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये आल्यानंतर महाजन यांनी गुरुवारी (दि.१८) माध्यमांशी संवाद साधला.
‘उद्धव ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर संजय राऊत यांनी ‘राडा’ करण्याचे आवाहन केले. त्यावर ‘राडा’ करायला कोणीही शिल्लक राहिलेले नाही. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आहात. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मागे-मागे फिरता,’ अशी टीका महाजन यांनी केली.
हिंमत असेल तर आडवे या, संजय राऊतांवर बोचरी टीका; शिंदेंच्या खासदाराचा ठाकरेसेनेवर हल्लाबोल
‘ठाकरे गटातील लोक ‘ग्राउंड’वर कुठे आहेत, राऊतांना त्यांचेच लोक, आमदार वैतागले आहेत. मुंबई महापालिकेतील नगरेसवकसुद्धा ‘जय महाराष्ट्र’ करतील. ‘उबाठा’ने लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. ज्यांना रहायचे त्यांनी रहा, ज्यांना जायचे त्यांनी जा, असे त्यांना सांगतात. पक्ष चालवण्याची ही कुठली पद्धत झाली? तुमची बडबड ऐकण्यासाठी लोकांना थांबयचेय तरी कुठे,’ असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. ‘भाजपकडून पैसे, ईडी आणि ईव्हीएमचा वापर करीत असल्याचा आरोप विरोधक करतात. परंतु, ते वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. खासदारांची संख्या वाढल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांची ताकद वाढली असली तरी, महायुतीचीच ताकद वाढणार आहे. त्यामुळे वाईट वाटायचे कारण नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena UBT Split : ‘धगधगता अग्नी चहूकडे अन् मार्ग निखाऱ्यांचा’; 6 वेळा फुटलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा इतिहास
‘शिंदेंकडून त्रागा नाही’
‘या निवडणुकीत नगरसेवकांवर अविश्वासाचा प्रश्न नाही. परंतु, निवडणुकीत काळजी घ्यावी लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही त्रागा केला नाही. त्यांनी नगरसेवकांना कडक शब्दात बोलावे लागले,’ असेही महाजन यांनी मान्य केले. ‘प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्याने घेतो. कार्यकर्त्यांसाठी आम्हाला यावे लागते. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांना वाऱ्यावर कसे सोडायचे? आमच्याकडे ही पद्धत नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे, त्यांची काय अवस्था झाली आपण पाहत आहात,’ असे महाजन म्हणाले. ‘आम्हाला अधिक मतदान होणार आहे. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात. एकदिवस आम्ही त्यांना जाऊन भेटलो तर काय झाले? असे ते म्हणाले.
