Vande Bharat Sleeper: मुंबई ते बंगळुरू या दोन प्रमुख शहरांना जोडणारी वंदे भारत लवकरच प्रवाशांचा सेवेत दाखल होणार आहे. ट्रेनच्या नव्या व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: वंदे भारत स्लीपर ट्रेनचा अवतार बदलत आहे. पुढच्या टप्प्यात ट्रेन अजून आधुनिक बनणार असून आणि नव्या सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्र ते कर्नाटक प्रवास सुखद होणार आहे. बदललेल्या नव्या वंदे भारत ट्रेनमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणं आणखी सोपं होणार असून प्रिमियम प्रवासाचा एक वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे.
काय असतील नव्या सुविधा?
आता सुरू असलेल्या वंदे भारतमध्ये दिवसाच्या प्रवासासाठी आरामदायी खुर्च्या व सीट उपलब्ध असतात. पण ही नवी ट्रेन फक्त रात्रकालीन प्रवासासाठी तयार केली आहे. ट्रेनच्या डिझाइनमध्ये मोठे बदल केले गेले आहेत. फर्स्ट एसी कोचमध्ये केलेल्या बदल एका व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्लीपर ट्रेनमध्ये वरच्या बर्थवर जाण्यासाठी शिडी लाववलेली असायची. यामुळे अनेक प्रवासी वरचं बर्थ घेणं टाळायचे. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना यावरून चढणं कठीण होतं. पणं वंदे भारत स्लीपरमध्ये शिडीऐवजी जिना लावला आहे. अपर बर्थसाठी सुरक्षित आणि आरामदायी जिन्याचा पर्याय आहे. फर्स्ट एसीमधील कोचला स्लाइडिंगचे दरवाजे लावलेले आहेत. या सर्व सुविधांमुळे वंदे भारतमध्ये बसून एखाद्या प्रिमियम ट्रेनने प्रवास केल्याचा अनुभव मिळणार आहे.
प्रवासात वेळ वाचणार?
याशिवाय वंदे भारत स्लीपर ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. मुंबई-बंगळुरू धावणाऱ्या ट्रेनमधून प्रवासासाठी तब्बल 20 तास लागतात. वंदे भारतमुळे हा वेळ 14 ते 15 तासांवर येणार आहे. भारतीय रेल्वेने अद्याप वंदे भारतचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं नसून ते होताच निश्चित वेळा समोर येतील. ट्रेनचा प्रवास वेगवान राहण्यासाठी कमीतकमी थांबे ठेवण्यात आले आहेत. ही ट्रेन 16 डब्यांची असून पूर्णपणे वातानुकूलित असेल. एकावेळी 823 प्रवालसी हाताळण्याची क्षमता या वंदे भारत स्लीपरमध्ये असेल. या नव्या ट्रेनची पहिली रेक बंगळुरूमधील एसएमव्हीटी रेल्वे स्थानकवर दिसून आली होती. कर्नाटकमधील 3 -4 चार शहरांना जोडून पुढे महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता आहे.
Navi Mumbai International Airport: परदेश भरारीसाठी मिळणार नवा पर्याय, नवी मुंबई विमानतळावर सुरू होणार आंतरराष्ट्रीय सेवा; तारीख समोर
मुंबई-बंगळुरू वंदे भारत ट्रेनचा अधिकृत मार्ग अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे कोणत्या स्थानकांवर थांबे असतील हेसुद्धा स्पष्ट केलेलं नाही. सध्या भारतीय रेल्वे या रेल्वे मार्गासाठी नकाशा तयार करत असून लवकरच ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली होणार आहे. तारीख जाहीर होताच वंदे भारतचे तिकीट IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा