• Mon. Nov 25th, 2024

    साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी, साईभक्ताने केले अडीच टन आंबे दान

    साई संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी, साईभक्ताने केले अडीच टन आंबे दान

    शिर्डी: ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या झोळीमध्ये देश विदेशातील साईभक्त विविध स्वरूपाचे दान देत असतात. आर्थिक स्वरूपाच्या दानाबरोबरच अन्नदान देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. शिरूर येथील साईभक्‍त शेतकरी रवी नारायण करगळ यांनी साधारण २ लाख २ हजार किमंतीचे २५२७ किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या प्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

    साई भक्ताच्या या दानातून श्री. साईबाबा संस्थानने भाविकांसाठी प्रसादलायात आमरसाची मेजवानी ठेवण्यात आली. या मेजवानीची चर्चा साऱ्या शिर्डीत ऐकायला मिळत आहे.

    WTC Final: टीम इंडियाचा आत्मविश्वास खोटा आहे; हरभजन सिंगने तर बीसीसीआयचा बँडच वाजवला
    देणगी स्वरुपात प्राप्त झालेले केसर आंबे रासायनिक प्रक्रिया न करता, नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहेत.आजपासून संस्‍थानच्‍या साई प्रसादालयात संस्‍थान कर्मचाऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी व साईभक्‍तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्‍यांच्‍या रसाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांनी या प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
    Satara News: कालव्याच्या पाण्याचा प्रचंड वेग, पोहता येत नव्हते तरी मारली उडी, शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत
    हा साई भक्त चार ते पाच वर्षापासून सेंद्रीय पध्‍दतीने पिकविलेले आंबे देणगी स्‍वरूपात संस्थान प्रसादालयासाठी देत आहे. मागील वर्षीही रवी करगळ यांनी सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५००० किलो केशर आंबे देणगी स्‍वरूपात दिले होते. त्याचा एक लाखाहूनअधिक साईभक्तांनी लाभ घेतला होता.

    Haircut: बापरे! केस कापण्यासाठी एवढं मोठं बिल, ते भरण्यासाठी घ्यावं लागलं कर्ज, किंमत जाणून धक्काच बसेल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *