• Sat. Sep 21st, 2024

विदर्भातील या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा

विदर्भातील या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा

Chandrapur Rain Yellow Alert : मान्सून महाराष्ट्रात तळ कोकणात दाखल झाला आहे. लवकर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातल्या एका जिल्ह्याला दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे.

 

Chandrapur Rain News
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा इशारा, विदर्भातील या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी
चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने चंद्रपूर जिल्ह्यासाठी ‘यलो अर्लट’ जारी केला आहे. हा अलर्ट १२ ते १४ जून पर्यंत आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. येत्या काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे. त्यापूर्वी जिल्हातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस बरसत आहे. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान केले आहे.काय करावे आणि काय करू नये…

वादळी वारे, आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये, याबाबत प्रशासनाने नागरिकांसाठी सुचना जारी केल्या आहेत. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद करावे, ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुंपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.
जेवण करताना दुसऱ्या खोलीत आगीचा भडका, ४ लाखांच्या नोटा जळताना पाहिलं अन् कुटुंबाच्या पायाखालील जमीन सरकली
आकाशात विजा चमकत असल्यास फोनचा वापर करू नये. शॉवरखाली आंघोळ करू नये. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाइपलाइन यांना स्पर्श करू नका. तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा उपयोग करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे वाहत असताना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये. धातुच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

डिझेल भरायला पैसे नव्हते, रुग्णवाहिका तब्बल एक तास पंपावर अडकली; गर्भवती महिलेला वेदना असह्य

जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed