• Sat. Sep 21st, 2024

भाजप-शिंदे गटात तू तू मैं मैं, फडणवीसांसमोरच ड्रामा, रेड्डी म्हणाले, हवं तर मला पक्षातून बाहेर काढा

भाजप-शिंदे गटात तू तू मैं मैं, फडणवीसांसमोरच ड्रामा, रेड्डी म्हणाले, हवं तर मला पक्षातून बाहेर काढा

नागपूर: नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात सर्व काही ठीक नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांच्यात तू तू मैं मैं झाली. रविवारी रेड्डी यांनी पुन्हा एकदा जैस्वाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यासोबतच रेड्डी यांनी पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी पक्षातून काढून टाकावे, असेही म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत शिवराय आणि बाबासाहेबांसोबत नथुराम गोडसेचा फोटो, तोंडभरुन स्तुतीही केली

देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील कामठी, रामटेक आणि मौदा तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. कामठी आणि मौदा येथे त्यांनी तालुका आढावा बैठका घेतल्या. दरम्यान पारशिवनी येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने व्यासपीठावर होते. रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी आशिष जैस्वाल यांचा चांगलाच समाचार घेतला.

मी शिवसेनेत असतो तर ४० तर सोडाच एक आमदार इकडचा तिकडे झाला नसता | नारायण राणे

माजी आमदार रेड्डी म्हणाले, ‘२०१९ मध्ये पक्षाने मला विधानसभेवर उमेदवारी दिली. मात्र तत्कालीन आमदार आशिष जैस्वाल यांनी भाजपची जागा बळकावली. मग भाजप-शिवसेनेची युती असताना जैस्वाल निवडणुकीत का उभे राहिले? जैस्वाल सध्याच्या भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये आहेत. मात्र आमच्या भाजपच्या बैठकीत ते व्यासपीठावर येऊन का बसले? असा थेट सवाल रेड्डी यांनी केला.
पार्टीचा मोह डॉक्टरला पडला महागात, अशी अद्दल घडली की…

जैस्वाल यांनी महाविकास आघाडीला अडीच वर्षे पाठिंबा दिला. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले. नंतर आमच्यात सामील झाले. ते कशासाठी आले? ते भाजपसाठी काही काम करायला आले का? तर नाही… मंत्रिपद त्यांना हवे आहे म्हणून आले. कमळाच्या चिन्हावर न लढणारा माणूस जर आपल्या व्यासपीठावर बसला असेल तर मी ते स्वीकारणार नाही, असे रेड्डी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सांगितले.

माजी आमदार रेड्डी इतके संतापले की, त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना स्टेजवरूनच सुनावले. ते म्हणाले की, तुम्हाला हवे असेल तर मला पक्षातून काढून टाका. मात्र मला हे मान्य नाही. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना माझा इतका विरोध नाही. पण आमच्या एका तरी सरपंचाला विकासनिधी दिला का? असा सवाल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed