• Sat. Sep 21st, 2024
VIDEO: प्रवाशाला हार्ट अटॅक, श्वासही थांबला, पण पोलीस देवदुतासारखे धावले; CPR देत वाचवला जीव

सोलापूर :सोलापूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला हृदयविकाराचा धक्का बसल्याची घटना घडली. मात्र आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत प्रवाशाला रेल्वे डब्यातून बाहेर काढले आणि समोर असलेल्या बेंचवर झोपवून त्याला सीपीआर देत त्याचा श्वास मोकळा केला आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सादिक इस्माईल पटेल (वय ४५, रा. रामवाडी ,सोलापूर) असं संबंधित प्रवाशाचे नाव आहे. ही घटना ११ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान एएसआय अजय महाजन आणि एएसआय एम. पी. सिंह या दोन जवानांनी सदर प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री नेहमीप्रमाणे सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूरपासून मुंबईकडे रवाना होणार होती. या गाडीच्या जनरल डब्ब्यात गर्दी होती. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून दोन आरपीएफ जवान अजय महाजन व एमपी सिंह हे जवळच थांबून गर्दीवर नियंत्रण मिळवत होते. मात्र यावेळी सादिक पटेल यांना हृदयविकाराचा धक्का बसला. सादिक पटेल यांचा श्वास रोखला गेला होता. ही बाब इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर असलेल्या आरपीएफ जवानांना माहिती दिली.

Mira Road Murder: मनोज साने थिअरीवर अडून बसला, तज्ज्ञ म्हणतात आता पोलिसांसमोर दोनच पर्याय उरलेत

आरपीएफ जवान देवदूतासारखे मदतीला धावले…

अजय महाजन आणि एम.पी सिंह यांनी हृदयविकाराचा धक्का बसलेल्या सादिक पटेल यांना ताबडतोब जनरल डब्ब्यातून बाहेर काढले. त्यानंतर बाकडावर झोपवले आणि छातीवर दाब देत पंपिंग केले. परिणामी श्वास रोखल्या गेलेल्या सादिक पटेल काही वेळात श्वास सुरू झाला. काही सेकंदात सादिक पटेल उठून बसले. यामुळे एम.पी.सिंह आणि अजय महाजन यांनी व इतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सादिक पटेल यांच्यासोबत त्यांची ११ वर्षीय मुलगी जोया देखील होती.

दरम्यान, आरपीएफ जवान अजय महाजन व एम.पी सिंह यांनी ताबडतोब प्रवासी सादिक पटेल यांचे नातेवाईक राजेसाब पटेल यांना माहिती दिली. नातेवाईक रविवारी रात्रीच सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले आणि सादिक पटेल यांना घरी घेऊन गेले. सादिक पटेल यांची माहिती घेतली असता, ते सध्या घरी सुखरूप आहेत. दोन जवान वेळीच प्रसंगावधान दाखवत सादिक यांच्यासाठी धावले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. सध्या सादिक पटेल यांच्यावर सोलापुरातील एका हृदयरोग तज्ज्ञाकडे उपचार व तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed