• Sat. Sep 21st, 2024

Tomato Prices: आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ; किलोला मोजावे लागताय इतके रुपये

Tomato Prices: आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ; किलोला मोजावे लागताय इतके रुपये

Tomato Price Hike : आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या किलोला अधिक रुपये मोजावे लागत आहे.

 

tomato.
Tomato Prices
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या एक किलो टोमॅटोची विक्री प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये या दराने केली जात आहे. गेल्या महिन्यात टोमॅटोचा प्रतिकिलो दर १० ते ३० रुपये होता.गेले दोन महिने टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेणे बंद केल्याने मार्केट यार्डमधील टोमॅटोची आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी, आता पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने टोमॅटोच्या दरात तेजी अली आहे. टोमॅटोचे उत्पादन वर्षभर घेतले जाते. पुण्यासह, नगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागांतून टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी बाजारपेठेत टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्या वेळी ग्राहकांकडून मागणी कमी होती. त्यामुळे टोमॅटोचे दर कोसळले होते. गेल्या महिन्यात घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टोमॅटोसाठी शेतकऱ्याला सहा ते १० रुपये दर मिळत होता. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटोचे पीक काढून टाकले. त्याचा परिणाम सध्या होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे.

गेल्या महिन्यात मार्केट यार्डात १५ हजार क्रेट्स टोमॅटेची आवक होत होती. आता ती सात ते आठ हजार क्रेट्सवर आली आहे. मागणीच्या तुलनेत ही आवक कमी होत असल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे किलोचे दर प्रतिकिलो २० ते २५ रुपयांवर पोहचले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
गृहिणींचे बजेट कोलमडले! महिनाभरात तूरडाळीच्या दरांत तब्बल इतकी वाढ, इतर डाळींचे दर असे…
किरकोळ बाजारात टोमॅटोच्या प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये किलो या दराने विक्री केली जात आहे. महिनाभरापूर्वी हे दर १० ते ३० रुपये होते. पुढील काही दिवस टोमॅटोच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.- प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते, किरकोळ बाजार

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed