• Sat. Sep 21st, 2024

सहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या महाकाय प्राण्याचे अवशेष विदर्भात

सहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या महाकाय प्राण्याचे अवशेष विदर्भात

यवतमाळ: सहा कोटी वर्षांपूर्वीच्या ‘लेट क्रिटाशीयस’ काळातील डायनासोरचे जीवाश्म वणी तालुक्यातील विरकुंड गावाजवळ आढळल्याचा दावा भूगर्भशास्त्र संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी डायनासोरच्या पायाचे एक अश्मिभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यात डायनासोरचे जीवाश्म आढळल्याची ही पहिलीच नोंद असल्याचे मानले जात आहे.वणी तालुक्यातील बोर्डा-विरकुंड परिसरात ‘निओप्रोटेरोझोईक’ या १५० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील पैनगंगा ग्रुपचा चुनखडक आहे. या काळात इथे समुद्र होता. ज्युरासिक काळात विशालकाय डायनासोरचा विकास झाला. सहा कोटी वर्षांपूर्वी क्रिटाशीयस काळात प्रचंड ज्वालामुखीच्या प्रवाहात सर्व सजीव आणि डायनासोर मारले गेले. बेसाल्ट या अग्निजन्य खडकाच्या रुपात हे पुरावे आजही दिसून येतात. परंतु अनेक ठिकाणी त्यांच्या हाडांचे जीवाश्मात रुपांतर झाल्याने ते आज सापडत आहेत, असेही प्राचार्य चोपणे यांनी सांगितले.

Mira Road Murder: कोट्यधीश आहे सरस्वतीला मारुन तिचे तुकडे शिजवणारा मनोज साने, पाहा संपत्ती किती?
विरकुंड गावाजवळ ५० वर्षांपूर्वीच्या डायनासोरचा अश्मिभूत सांगाडा असावा. लोकांनी जंगलात शेती करताना चुनखडक घरे आणि पहार बांधण्यासाठी वापरला. हाडे आणि चुनखडक दुरून सारखाच दिसत असल्याने गावकऱ्यांनी डायनासोरची हाडेसुद्धा घरे बांधण्यासाठी वापरली. त्यामुळे येथे पुन्हा जीवाश्म आढळले नाही. चाळीस वर्षांपूर्वी शेतीसाठी रचलेल्या दगडी पहारीत सुरेश चोपणे यांना एक जीवाश्मकृत हाड सापडले. जीवाश्मांच्या आकार, प्रकार, स्थळ, काळावरून आणि भूशास्त्र विभागाचे तज्ज्ञांच्या मतानुसार हे जीवाश्म डायनासोरचेच असल्याचा विश्वास प्राचार्य चोपणे यांनी व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असल्याने खूप जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले आहेत.

Weather Alert: पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट
‘भूशास्र विभागाने सर्वेक्षण करावे’

चंद्रपूरप्रमाणे वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरी, मुकुटबन हा परिसर जीवाश्मांच्या आणि प्रागैतिहासिक बाबतीत समृद्ध आहे. या परिसरात अजून जमिनीत किंवा जंगली भागात डायनासोरची जीवाश्म आढळू शकतात. त्यासाठी भूशास्त्र विभागातर्फे सविस्तर सर्व्हे आणि संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत संशोधक प्राचार्य सुरेश चोपणे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले आहे.

मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

२० वर्षांपासून शोध

यवतमाळ जिल्ह्यात तब्बल वीस वर्षांपासून प्राचार्य चोपणे हे सर्वेक्षण करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पांढरकवडा, राळेगाव, झरी तालुक्यात सहा कोटी वर्षांपूर्वीच्या शंख-शिपल्याची जीवाश्म तर दीडशे कोटी वर्षांपूर्वीची ‘स्ट्रोमॅटोलाइट’ची जीवाश्म शोधून काढली आहेत. २५ हजार वर्षांपूर्वीची पाषाणयुगीन अवजारेसुद्धा त्यांनी शोधली आहे. हे सर्व पुरावे त्यांच्या घरी व्यक्तिगत शैक्षणिक संग्रहालयात सामान्य नागरिक आणि संशोधकांसाठी प्रदर्शित करून ठेवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed