• Mon. Nov 25th, 2024
    नागरिकांकडून पोलिस कर्मचाऱ्यालाच दमदाटी; ‘तुमची नोकरी घालवतो’ अशी धमकी

    chhatrapati Sambhajinagar News: संत रोहिदासनगर येथे पोलिसांविरोधताच दमदाटी करण्याचा प्रकार घडला. वॉरेंट बाजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना नागरिकांनी घेरले, तसेच त्यांना धमकावण्यातही आले. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरात कोंबिंग आणि नाकाबंदी असल्याकारणाने, न्यायलयाचे अजामीनपत्र वॉरंट बजविण्यासाठी गेलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपीसह, आसपासच्या नागरिकांनी दमदाटी केल्याची घटना संत रोहिदासनगर भागात घडली. पोलिसांना आरोपींच्या नातेवाइकासह आसपासच्या लोकांनी घेरल्याने त्याला पोलिस मदतीसाठी संपर्क करावा लागला. संबंधितांनी कोर्टात तक्रार करून नोकरी घालविण्याची धमकी दिली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस अंमलदार अजय नारायण राठोड, आठ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास न्यायालयाचे वॉरंट बजविण्यासाठी संत रोहिदासनगर येथे गेले होते. ते रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान संजय श्यामलाल तरटे (रा. संत रोहिदासनगर) यांच्या घर असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी संजय तरटे यांना आवाज दिला. त्यांना वॉरंटबाबत सांगितले; तसेच सोबत येण्याबाबत सांगितले. त्यानुसार संजय तरटे आले. आणि त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अजय राठोड यांच्या शर्टाची कॉलर पकडून दमदाटी सुरू केली. यानंतर संजय यांचा भाऊ राजू श्यामलाल तरटे आणि त्यांची आई आली. यानंतर संजय तरटे यांच्या शेजारी राहणारे काही जण जमा झाले.
    ३२ वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणातील आरोपी अखेर सापडलाच; पोलीसांनी मोठ्या शिताफीने केली अटक
    नागरिकांनी घातला घेराव
    तुम्ही एवढ्या रात्री कसे काय घेऊन जात आहात, असे सांगून सर्व एकत्र जमा झाले. अजय राठोड यांच्यासोबत असलेल्या खरात या पोलिस कर्मचाऱ्याला खाली पाडले. संजय तरटे यांच्या पत्नीने तुम्ही रात्रीच्या वेळी घरी आलेच कसे? कोर्टात तक्रार करून तुम्हा पोलिसवाल्यांची नोकरी घालवितो, असेही सांगितले. ही घटना वाढत असल्याने अखेर अजय राठोड यांनी पोलिसांची मदत मागितली. अन्य पोलिस कर्मचारी आल्यानंतर पोलिसांना दमदाटी करणारा संजय तरटे आणि विजय नरवडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात अजय राठोड यांच्या तक्रारीवरून संजय तरटे, त्यांची पत्नी, राजू तरटे, विजय नरवडे, अनिल गोटवाल, मनोज जाधव, गणेश यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed