म. टा. वृत्तसेवा, भंडारा : ‘एकत्र जगू आणि एकत्र मरू’ असे म्हणत वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन केले. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. ही घटना साकोली तालुक्यातील एकोडी गावातील आहे. रामू आसाराम बघेल (वय ६५) आणि शांता रामू बघेल (वय ५९) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
पती-पत्नीने ३ जून रोजी सायंकाळी विषारी औषध प्राशन केले. घरात असलेल्या सुनेलाही त्यांना कळू दिले नाही. मात्र विष प्राशन केल्यानंतर पत्नी शांता हिला उलट्या झाल्या. सुनेने उलट्यांबाबत चौकशी केली असता तिला विषाचा वास आला. त्यावेळी सासू शांता यांनी दोघांनीही विष प्राशन केल्याचे तिला सांगितले. सुनेने पती जगदीश यांना फोन करून माहिती दिली. मुलगा तत्काळ घरी पोहोचला. त्याने आई-वडिलांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना ७ जून रोजी सकाळी ९.३० वाजता पत्नी शांता आणि दुपारी २.३० वाजता पती रामू बघेल यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघेही आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या आजाराला कंटाळून दोघांनी हे पाऊल उचलले असल्याचा कयास व्यक्त होत आहे.