• Sat. Sep 21st, 2024
Cyclone Biporjoy: मुंबईत बिपरजॉय चक्रीवादळ धडकलं, गिरगाव चौपाटीवर रौद्ररूप दाखवणारा VIDEO समोर

मुंबई : देशाच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ हे सध्या रौद्ररूप धारण करणार आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशाच्या अनेक राज्यांवर होताना दिसत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील २४ तास धोकादायक होण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावासाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने सांगितले की, सध्या बिपरजॉय वादळ गुजरातमधील पोरबंदरपासून ६४० किमी दक्षिण- नैऋत्य दिशेला आहे. सोमवारपर्यंत हे वादळ दक्षिण गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांना किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आले आहे.

Cyclone Biporjoy : चक्रीवादळ दाखवणार आज रौद्ररूप, या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस तर कुठे उन्हाचा तडाखा

मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना

खरंतर, वारंवार होणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम स्थानिक पातळीवरही पाहायला मिळतो. यामुळे सकाळच्या वेळी उष्णतेचा तडाखा आणि घामाच्या धारा पाहायला मिळतात तर संध्याकाळी मात्र पावसाच्या सरी बरसत असल्याचं वातावरण आहे. अशात किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्यामुळे मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Weather Alert: पुढच्या ५ दिवसांत सूर्य आग ओकणार, या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून तीव्र उष्णतेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या किनारी भागात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असून यामुळे काही भागात कडक हवामान असण्याची शक्यता आहे. तर IMD ने मच्छिमारांसाठी इशारा दिला आहे. अशात राजधानी दिल्लीत मान्सूनचे आगमन होणार असले तरी उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. येत्या काही दिवसांत दिल्लीतील तापमान वाढणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.

१०, ११ आणि १२ जून रोजी जास्तीत जास्त प्रभाव…

अहमदाबादमधील हवामान विभागाच्या विज्ञान केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या चक्रीवादळामुळे १०, ११ आणि १२ जून रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ नॉट्स वेगाने वाहू शकतो. वाऱ्याचा वेगही ६५ नॉट्सपर्यंत जाऊ शकतो. चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस पडू शकतो. याबाबत सर्व बंदरांना कळविण्यात आले आहे.’

Cyclone Biporjoy : राज्यावर ३ दिवस अस्मानी संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह या भागांना धोक्याचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed