• Wed. Nov 27th, 2024
    नाशिककरांसाठी गुड न्यूज! ३० वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार, अशी आहे २०४ कोटींची योजना…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत साडेबारा किलोमीटर लांबीच्या लोखंडी जलवाहिनीच्या २०४ कोटींच्या महापालिकेच्या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिककरांचा २०५५ पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार आहे. या नव्या योजनेमुळे अस्तित्वातील २३ वर्षे जुन्या सिमेंट जलवाहिनीला पर्याय उपलब्ध होणार असल्याने पाणीगळतीचीही समस्या संपुष्टात येणार आहे. सिंहस्थापूर्वी ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले असून, त्यासाठी येत्या १५ दिवसांतच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाचा निधीदेखील मंजूर झाला आहे.

    आवड म्हणून घरचा टेम्पो चालवायच्या, नाशिकच्या माधवी साळवे कशा बनल्या ST ड्रायव्हर
    शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणसमूह व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून ७० टक्के पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते. सन २०२१ पर्यंतची शहराच्या पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेत, सन २००० मध्ये १२०० मिमी व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. गेल्या २३ वर्षांत या जलवाहिनीची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार गळतीची समस्या उद्भवत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान ४२५ एमएलडी क्षमतेची १२.५० किलोमीटर लांबीची १८०० मिमी व्यासाची नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक छाननीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Nashik News : धुलाई समिती गोत्यात! प्रथमदर्शनी ६७ लाखांचा घोटाळा उघड, अटी-शर्तींचाही भंग
    २०५५ पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार

    > केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाचा निधी मंजूर

    > या प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित

    > पुढील आठवड्यात या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात

    > निविदा सादर करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत

    > दोन वर्षांच्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल

    > सिंहस्थापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

    केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवलं, मुलीचं बळजबरीनं लग्न लावलं; नाशिकमध्ये खळबळ

    …अशी आहे योजना

    > गंगापूर धरणातून थेट १२.५० किमी लोखंडी जलवाहिनी

    > ४०० एमएलडी क्षमतेची १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी

    > सन २०५५च्या लोकसंख्येनुसार जलवाहिनीची क्षमता

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed