Mahayuti Cabinet Formation: महायुती सरकार मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती राज्यात गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुती सरकारमध्ये नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देत गुजरात पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. त्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील तीन युवा आमदारांचा समावेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामध्ये कोकणातून शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.
Eknath Shinde: केंद्रात मंत्रिपद नको, ऑफर नाकारली; शिंदेंची खासदार लेकासाठी मोठी मागणी, भाजप बुचकळ्यात
महायुतीला वन साईड २३२ जागांचा बहुमत मिळाल्यावरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. मुख्यमंत्री कोण होणार यामध्ये अजून महायुतीचे ठरत नाही. दिल्लीतून हायकमांड कोणते निर्देश देतील त्यावरच मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, भाजपामधून देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी आहे तर शिंदे गटाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विविध योजनांमुळे महायुतीच्या सरकार काळातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एक वर्षासाठी का होईना पण संधी मिळावी अशाही प्रतिक्रिया येत आहेत. तर काहींना देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी त्यांचा प्रशासनातील अनुभव व भाजपाला मिळालेल्या जास्त जागा यामुळे त्यांचा हक्क मुख्यमंत्री पदावर असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात शिवसेनेकडून कोणाला स्थान दिले जाईल यासाठी अनेकांची धाकधूक वाढली आहे. कोकणातून रत्नागिरीचे उदय सामंत व महाडचे आमदार भरत गोगावले ही दोन नावे कॅबिनेट मंत्रीपदासाठी निश्चित झाली आहेत. तर तळ कोकणातून दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत असलं तरीही त्यांचा पत्ता आयत्यावेळेला कापला जाऊ शकतो. त्यांच्यावर संघटनात्मक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी दापोली येथील सभेत ‘तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो’ असा शब्द दिला होता आता हा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येऊन पडली आहे. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र युवा आमदार योगेश कदम यांना मंत्रिमंडळ स्थान देत नव्या तरुण चेहऱ्याला एकनाथ शिंदे हे मानाचे पान देण्याची शक्यता आहे.
Ratnagiri Mahyuti: मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसणार, इच्छुकांचा पत्ता कट? महायुती राज्यात गुजरात पॅटर्न राबवणार?
अजित दादांचे राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्यासाठीही मंत्रिमंडळात समावेशनाची मागणी होत आहे मात्र निकम यांच्या नावाचा विचार पहिल्या यादीत केला जाण्याची शक्यता कमी आहे. योगेश कदम यांच्याबरोबर नरेंद्र भोंडेकर, प्रकाश आबीटकर या दोन युवा आमदारांचाही शिवसेनेकडून समावेश होणार आहे. त्यामुळे आता कोकणातून योगेश कदम यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. योगेश कदम हे दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यांच्या कामाच कौतुक मुख्यमंत्र्यांनी दापोली येथील सभेतही केलं होतं. त्यामुळे योगेश कदम यांच्याकडे आता कोणतं खातं येतं हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे, की त्यांना या सगळ्या राजकीय घडामोडीत पुन्हा वेटिंगवर रहावे लागते याकडे आता अनेकांचे लक्ष लागल आहे.