Beed Farmer Sucess Story : कोरियन कार्पेट गवताची लागवड करुन तरुण शेतकऱ्याने मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. मंगल कार्यालय, हॉटेल्सला लॉन्सची विक्री केली जाते. तरुण शेतकऱ्याच्या या यशस्वी शेतीची सर्वत्र एकच चर्चा आहे.
Farmer Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न
अनोख्या शेतीतून लाखोचंं उत्पन्न
हॉटेल्स, मंगल कार्यालय या ठिकाणी असलेल्या लॉन्ससाठी लागणारे कोरियन कार्पेट नावाचे गवत या तरुणाने आपल्या शेतात लावले असून यातूनच तो वर्षभरात वीस ते पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळवतो आहे.
Success Story : MBA चं शिक्षण घेतलं, पण नोकरी न करता घरातच सुरू केली शेती, आता वर्षाला ९० लाखांची कमाई
कोरियन कार्पेट गवताची लागवड
ग्रामीण भागातील तरुण शेतीमध्ये उत्पन्न नाही, हाताला काम नाही, म्हणून शहराची वाट धरत असल्याचं आपण अनेकदा बघतो, पण बीड येथील ज्ञानेश्वर घोलप या तरुणाने मात्र शेतकरी आणि बेरोजगार युवकांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्ञानेश्वर घोलप या तरुणाने बीड जवळील आपल्या शेतीत चक्क कोरियन कार्पेट या गवताची लागवड करत लॉन्ससाठी याची विक्री सुरू केली आहे. त्याच्या या नव्या प्रयोगाला चांगलं यश मिळालं आहे.
Pune News : पुण्याच्या शेतकऱ्याला कोथिंबिरीने केलं मालामाल, पिकाला आधुनिकतेची जोड देत घेतलं २१ लाखांचं उत्पन्न
Farmer Sucess Story : कोरियन कार्पेट गवताची लागवड, बीडच्या तरुणांचा यशस्वी प्रयोग; शेतीतून करतोय लाखोंची कमाई
इतकंच नाही तर त्यांनी आता बीड जवळील हिरापूर येथे अशाच पद्धतीचा आणखी एक प्रकल्प सुरू केला आहे. यातून वर्षाकाठी ज्ञानेश्वर घोलप वीस ते पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आता यापुढेही अशाच पद्धतीने नवनवीन प्रयोग करण्याचा मानस ज्ञानेश्वर घोलप या तरुणाने व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर घोलप यांनी आधुनिक पद्धतीने आणि वेगळे प्रयोग केल्यास कसं यश मिळू शकतं, हेच आपल्या या लॉन्सच्या शेतीतून दाखवून दिलं आहे.