• Sat. Sep 21st, 2024

कोकणवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिफ्ट; समृद्धीप्रमाणेच होणार ‘मुंबई-सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे’

कोकणवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठं गिफ्ट; समृद्धीप्रमाणेच होणार ‘मुंबई-सिंधुदुर्ग एक्सप्रेस वे’

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : ‘कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. सर्वांचा पाहुणचार करणाऱ्या कोकणातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच मुंबई ते सिंधुदुर्ग असा एक्स्प्रेस वे तयार केला जाईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोकणच्या विकासासाठी प्राधिकरणाची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. कोकणातील कोस्टल रोड एमएसआरडीसी’च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल. स्थानिक मालाचे ब्रॅण्डिंग करून मार्केटिंग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी निधी देऊ’, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, नितेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले उपस्थित होते.

मंत्रीमंडळ विस्तार होणारच, केव्हा होणार ते शिंदे ठरवतील – फडणवीस


सावंतवाडीतील कामे

■ संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर
जिमखाना मैदान येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरूवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणे
■ अग्निशमन वाहन खरेदी
■ अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा निवासस्थान
■ पाणी पुरवठा योजना सुधारणा
| शहरातील जीर्ण झालेली वितरण व्यवस्था बदलणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed