• Sat. Sep 21st, 2024

मुंबईतील भुयारी मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय? पहिली भूमिगत मेट्रो कशी असणार? जाणून घ्या…

मुंबईतील भुयारी मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय? पहिली भूमिगत मेट्रो कशी असणार? जाणून घ्या…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील एका गाडीसाठी जवळपास ६.६१ लाख युनिट वीज खर्च होणार आहे. प्रति किमी, प्रति प्रवासी ८.४० युनिटच्या रूपात हा खर्च होणार आहे. मात्र या गाड्या पर्यावरणानुकूल असल्याने अन्य गाड्यांच्या तुलनेत वीज कमी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

मेट्रो ३ ही मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते बीकेसी हा डिसेंबर २०२३पासून सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा धारावी ते कफ परेड हा डिसेंबर २०२४पासून सुरू होणार आहे. आरे ते कफ परेड, ही संपूर्ण मार्गिका ३३.५ किमी लांबीची असेल.

या मार्गावरील मेट्रो ही आठ डब्यांची असेल. अशा एकूण ३१ गाड्या फ्रान्सची अल्स्टॉम कंपनीकडून तयार होत आहेत. या गाड्या पर्यावरणानुकूल असतील, त्यामुळेच गाडीसाठी वापरलेले सामान ९५ टक्के पुनर्वापर करण्याजोगे असेल. त्यामुळेच प्रति किमी, प्रति प्रवासी ८.४० युनिट वीज खर्च होणार असली तरी गाडीच्या प्रवासी क्षमतेच्या तुलनेत हा वीजवापर कमी आहे. या गाडीची क्षमता २,३५० प्रवासी इतकी आहे. यानुसार गाडीने पूर्ण भरून ३३.५ किमीचा प्रवास केल्यास त्यापोटी जवळपास ६.५१ लाख युनिट वीज खर्च होणार आहे. मात्र या गाड्या पर्यावरणानुकूल असल्याने अन्य गाड्यांच्या तुलनेत या गाडीला कमी वीज लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकलच्या तुफान गर्दीत लेकराला एकदम स्पेशल सीट; आईची अनोखी शक्कल

बालासोर रेल्वे अपघातात मराठमोळे अधिकारी ठरले देवदूत, शेकडोंचा जीव वाचला

मेट्रो ३वरील वीजवापर

एका गाडीसाठी- सुमारे ६.६१ लाख युनिट वीज खर्च

प्रति किमी, प्रति प्रवासी- ८.४० युनिट वीज खर्च

गाडीची क्षमता २,३५० प्रवासी- सुमारे ६.५१ लाख युनिट वीज खर्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed