• Mon. Nov 25th, 2024
    पांडुरंग, पांडुरंग! पायी चालताना रिक्षाची धडक, दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला; नाशिक सुन्न

    नाशिक : आषाढी एकादशी वारीसाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या श्री. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील एका ६५ वर्षीय वारकऱ्यावर काळाने घाला घातला आहे. या पायी दिंडीतील एका वारकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. मधुकर शिंदे असं मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव असून ते जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या महाजनपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

    २ जून रोजी नाशिकच्या त्रंबकेश्वर येथून श्री. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी दिंडी ही पंढरपूरकडे प्रस्थान झाली. या दिंडी सोहळ्यात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या पालख्या सहभागी झाल्या आहेत. हरिनामाच्या गजरात दंग होऊन पालखी पंढरपूरकडे जात असताना नाशिकमध्येच या पालखीला विघ्न आलं आहे. एका वारकऱ्याला रिक्षाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्व वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

    शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर
    निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत जवळपास २५ हजारहून अधिक वारकरी बांधव सहभागी झाले असून सलग २७ दिवस जवळपास ४८० किलोमीटर पंढरपूरकडे चालत निघाले आहेत. अशातच नाशिकमधून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जात असताना सातपूरजवळ या दिंडीत दुर्दैवी घटना घडली आहे. एका ६५ वर्षीय वारकऱ्याचा रिक्षाचा धडकेत अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता वारीच्या आयोजकांची देखील काळजी वाढली आहे.

    निफाड तालुक्यातील मधुकर शिंदे हे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी झाले होते. दुर्दैवाने नाशिक पार होण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *