• Sat. Sep 21st, 2024

आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल

आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल

सोलापूर: सोलापुरातील डॉ व्ही. एम मेडिकल कॉलेज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील विद्यार्थ्याने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी अधिकृत माहिती दिली.

आकाश संतोष जोगदंड (वय २४ रा चौसळा, जिल्हा बीड) असे मृत्यू विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश जोगदंड याने गळफास घेण्याअगोदर भावनिक पत्र लिहिले आहे. माझ्या मृत्यूची माहिती आईला आणि बाबांना सांगू नका, त्यांना सहन होणार नाही. मी गळफास घेतल्याची माहिती माझ्या मामांना सांगा, असा मजकूर लिहीत आकाशने मामाचा मोबाईल नंबरही चिठ्ठीत नमूद केला होता.

पोलिसांनी आकाशच्या मामाला सोलापुरात बोलावून घेतले आहे. आकाशच्या मृतदेहावर सोलापूर पोलिसांनी पंचनामा करून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह दाखल केले आहे.

आनंदाने लग्नाची सारी तयारी केली, हळदीला पहाटेपर्यंत नाचला, मग झोपायला गेला अन्…
आई बाबाना सांगू नका ते सहन करणार नाहीत; आकाशचे भावनिक पत्र

आकाश जोगदंड हा सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. गळफास घेण्याअगोदर त्याने शहरातील हॉटेल रितेशमध्ये मुक्काम घेतला होता. सोमवारी सकाळी ज्यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आकाशने गळफास घेतल्याचं लक्षात आले, तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता आकाश जोगदंड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गळफास घेण्याअगोदर त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भावनिक आवाहन केले होते. मी गळफास घेतल्याची माहिती माझ्या आई-बाबांना सांगू नका, ते सहन करु शकणार नाहीत. माझ्या मृत्यूची माहिती माझ्या मामाना सांगा. अशा आशयाचा भावनिक मजकूर त्या चिठ्ठीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मी १२ तास अभ्यास करायची, UPSC परिक्षेत द्वितीय आलेली गरिमा लोहिया

एमबीबीएस पहिलेच वर्ष पास होत नव्हता

आकाश जोगदंडने २०२० मध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात सोलापुरातील शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. २०२० पासून तो सतत परीक्षा देत होता. मात्र, पहिलेच वर्ष पास होत नव्हतं. तीन वर्षांपासून आकाश सतत नापास होत असल्याने तो नैराश्यचे जीवन जगत होता. अखेर त्याने गळफास घेत जीवन यात्रा संपवली.

शासकीय महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या भावी डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. आकाश जोगदंडचे मामा देखील मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.

नको जाऊ गं… बापाने पाया पडल्या, विनवण्या केल्या, पण त्या निष्ठुर पोरीने काही ऐकलं नाही, अन्… पाहा VIDEO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed