• Sat. Sep 21st, 2024

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जूनपासून कंपन्यांसाठी नवे दर, CNG आणि PNG स्वस्त होणार?

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जूनपासून कंपन्यांसाठी नवे दर, CNG आणि PNG स्वस्त होणार?

CNG PNG Latest News : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याने सामन्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने CNG आणि PNG बाबत इंधन कंपन्यांना नवे दर लागू केले आहेत. याचा फायदा सामान्यांना होणार आहे.

 

cng prices to go down central government take big decision
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ जूनपासून कंपन्यांसाठी नवे दर, CNG आणि PNG स्वस्त होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वाहनांसाठी लागणारा सीएनजी व स्वयंपाकासाठी लागणारा पीएनजी स्वस्त होण्याची आशा आहे. इंधन कंपन्यांना नैसर्गिक वायूच्या विक्रीचे नवे दर केंद्र सरकारने एक जून रोजी निश्चित केले आहेत. त्यानुसार हा वायू किलोमागे २.५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे.नैसर्गिक वायूच्या किमती दरमहा निश्चित करण्याची किरीट पारिख समितीची शिफारस केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात स्वीकारली. या अंतर्गत ठरावीक श्रेणीत नैसर्गिक वायूचे दर निश्चित करण्यात आले असून, हे दर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ठरतात. त्यानुसार एक जूनपासून निश्चित झालेल्या दरांचा विचार केल्यास, त्यात किलोमागे २.१८ रुपयांची कपात झाली आहे.

कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाबाबात गुड न्यूज! वनखात्याचा ग्रीन सिग्नल
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण सेलनुसार (पीपीएसी), मे महिन्यातील नैसर्गिक वायूचा दर ८.२७ डॉलर प्रति दशलक्ष युनिट (एमएमबीटीयू) इतका होता. तो जून महिन्यासाठी ७.५८ डॉलर प्रति दशलक्ष युनिट करण्यात आला आहे. यानुसार ग्राहकांपर्यंत नैसर्गिक वायू पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी नैसर्गिक वायू ०.६९ डॉलर प्रति एमएमबीटीयूने स्वस्त झाला आहे. एक किलो नैसर्गिक वायूमध्ये ४६ हजार ४५२ युनिट असतात. त्यानुसार एमएमबीटीयूमध्ये २१.५३ किलो नैसर्गिक वायूचा समावेश होतो. प्रति एमएमबीटीयू नैसर्गिक वायू ०.६९ डॉलरने स्वस्त करण्यात आला आहे. या सर्व समीकरणांचा विचार केल्यास, नैसर्गिक वायू २.५६ रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे. त्यानुसार आता नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सीएनजी व पीएनजी दरात कपात करणे अपेक्षित आहे.
Mumbai Metro 3 : आरे ते कफ परेड मेट्रो कधी सुरू होणार ? मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed