संतोष चव्हाण (वय.४१,रा. अलिबाग रायगड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, रिक्षाचालकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येतो आहे. ही घटना गुरुवारी (दि.१) पहाटे एक वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोडच्याजवळील रिक्षा थांब्याजवळ घडली आहे. याबाबत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चव्हाण हे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचलाकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान वाद झालेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडला. चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार रिक्षाचलाकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कारके करीत आहेत.
अनेकदा आपण रिक्षा चालकांची मुोजरी अनुभवतो. प्रस्थपित रिक्षा चालकांच्या एरियामध्ये नवखा कोणी रिक्षा चालक दिसला तर त्याच्यावर दादागिरी, आणि दमदाटी केली जाते. या कारणामुळे प्रवासना नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र पुण्यातल्या स्वारगेट परिस्थिती अशाच एक कारणामुळे दोन रिक्षा चालकांमध्ये भांडण झाले आणि एकाने दुसऱ्याचा कान चावला गाण्याचा लचका तोडला.